दरोडेखोरांची टोळी जेरबंद : गावठी कट्टा अन् जीवंत काडतुसे जप्त

By admin | Published: May 11, 2017 03:55 PM2017-05-11T15:55:48+5:302017-05-11T15:55:48+5:30

शहरासह संपुर्ण जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दोरोडेखोरांसह अट्टल घरफोड्यांची टोळी शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केली

The gang of robbers was seized: seized a black and white cartridge | दरोडेखोरांची टोळी जेरबंद : गावठी कट्टा अन् जीवंत काडतुसे जप्त

दरोडेखोरांची टोळी जेरबंद : गावठी कट्टा अन् जीवंत काडतुसे जप्त

Next

नाशिक : शहरासह संपुर्ण जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दोरोडेखोरांसह अट्टल घरफोड्यांची टोळी शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केली आहे. लाखलगाव जवळील पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्यामधील संशयिताचा माग काढताना पोलिसांना या टोळीचा सुगावा लागला.
संशयितांकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह एक मोटार पाच दुचाकी, सोन्याचांदीचे दागिणे, दहा मोबाईल असा एकूण सात लाख १६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पेट्रोल पंपावरील दरोड्यामधील संशयिताची गुप्त माहिती मिळाली होती. त्याच्यावर पाळत ठेवून खात्री पटल्यानंतर मखमलाबाद येथील कोळीवाडा परिसरातून नितीन निवृत्ती पारधी या संशयिताला पोलिसांनी अटक केली. पोलीस कर्मचारी विशाल काठे, मोहन देशमुख, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, शांताराम महाले यांनी पारधीच्या मुसक्या आवळून ‘खाकी’चा हिसका दिल्यानंतर त्याने विविध गुन्ह्यांची कबुली देत त्याच्या साथीदारांसह मुद्देमालाची माहिती दिली. पेट्रोल पंपावरीलसीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या टोळीला जेरबंद करण्यात आले.


-
...असा आहे मुद्देमाल
गावठी पिस्तुल, जिवंत काडतुसे, एक लाखाची यामाहा एफ झेड मोटारसायकल, पन्नास हजाराची ह्यंदाई कंपनीची मोटार, प्रत्येकी एक लाख रुपये किमतीच्या चार पल्सर-२२० दुचाकी, ऐंशी हजाराचे दहा मोबाईलसह लाखलगाव येथील सराफाचे दुकान लुटीमधील सोन्याची मुरणी, नथ, चांदीचे बाजुबंद, छल्ला, कडे असे वीस हजारांचे दागिण्यांसह तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीमधील १२ ग्रॅम सोने, मोबाईल असा एकू ण ७ लाख १६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Web Title: The gang of robbers was seized: seized a black and white cartridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.