येवल्यात दुचाकीचोरांची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:16 AM2021-07-31T04:16:18+5:302021-07-31T04:16:18+5:30
शहरासह तालुक्यातील दुचाकी चोरींचे सत्र सुरू होते. त्यानुसार ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत ...
शहरासह तालुक्यातील दुचाकी चोरींचे सत्र सुरू होते. त्यानुसार ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनमाडचे उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, एकनाथ भिसे, पोलीस शिपाई सतीश मोरे, आबा पिसाळ, मुकेश निकम, दिनकर पारधी, गणेश सांगळे, नितीन पानसरे, गणेश सोनवणे, किरण पवार यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचला असता कोळपेवाडी ता. कोपरगाव जि. अहमदनगर येथून दोन तर भडाणे, ता. चांदवड येथून दोन अशा चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. या चौघांकडून ७ बजाज पल्सर, ४ हिरो एचएफ डीलक्स, २ हिरो स्प्लेंडर, १ युनिकॉन, १ टी.व्ही.एस स्टार सिटी, १ बुलेट अशा १६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या नितीन सखाराम माळी (वय २४), रोहित साहेबराव त्रिभुवन ऊर्फ बाल्या (वय २४) दोघे रा. चाळीस झोपडी, सुरेगाव, कोळपेवाडी जवळ, ता. कोपरगाव जि. अहमदनगर, प्रवीण ऊर्फ मुकुंदा बाळू मोरे (वय २०), अनिल बापू सोनवणे (वय २४) दोघे रा. भारतनगर, भडाणे ता. चांदवड जि. नाशिक या चौघा दुचाकी चोरट्यांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांना येवला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
फोटो- ३० येवला पोलीस
दुचाकी चोरांसमवेत येवला तालुका पोलिस अधिकारी व कर्मचारी.
300721\30nsk_44_30072021_13.jpg
फोटो- ३० येवला पोलीस दुचाकी चोरांसमवेत येवला तालुका पोलिस अधिकारी व कर्मचारी.