गाडगे महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:05 AM2019-02-24T00:05:41+5:302019-02-24T00:06:22+5:30

राष्टसंत श्री गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विहितगाव व देवळालीगाव येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

 Ganga greetings for the birthday of Gadge Maharaj | गाडगे महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन

गाडगे महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन

googlenewsNext

नाशिकरोड : राष्टसंत श्री गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विहितगाव व देवळालीगाव येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
राष्टÑसंत श्री गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विहितगाव येथील पुतळ्यास खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच देवळालीगाव येथे मराठा परिट समाजाच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, नगरसेवक सूर्यकांत लवटे, केशव पोरजे, सुनीता कोठुळे, सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी काश्मीरमधील पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सुधाकर जाधव, मनोहर कोरडे, श्याम खोले, योगेश देशमुख, संतोष सहाणे, बंटी कोरडे, भय्या मणियार, प्रदीप देशमुख, विकास बोराडे, शंकर साडे, गणेश बनकर, उत्तम कोठुळे, शशिकांत राऊत, राम जमधडे, संदीप आहेर, दीपक बोराडे, दीपक जमधडे, शरद बोराडे, संदीप बोराडे, गणेश वाघ, योगेश जमधडे, हेमंत चौधरी, सनी जमधडे, शशिकांत चौघरी, गणेश चौधरी, सागर चौधरी, जयेश बोराडे, अमर जमधडे, स्वप्नील शहाणे आदि उपस्थित होते.
नाशिक शहरात मिरवणूक
संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त नाशिक शहरातून मिरवणूक काढण्यात आली. बी. डी. भालेकर हायस्कूल मैदानापासून सुरू झालेली ही मिरवणूक गाडगे महाराज पुतळ्यापाशी आली. तेथे आरती केल्यानंतर मिरवणूक गंगाघाटावर विसर्जित करण्यात आली.

Web Title:  Ganga greetings for the birthday of Gadge Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक