गंगाघाटाला पुन्हा अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:12 AM2019-12-22T00:12:15+5:302019-12-22T00:12:35+5:30
मनपाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही दिवसांपूर्वी मनपा अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण गंगाघाट परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाºया कामांच्या नियोजनाबाबत पाहणी करत परिसरातील रस्त्यांवर विविध व्यावसायिक तसेच फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे परिसर बकाल होत असल्याने तत्काळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र अतिक्रमण विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमण कमी होण्याऐवजी वाढले आहे.
पंचवटी : मनपाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही दिवसांपूर्वी मनपा अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण गंगाघाट परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाºया कामांच्या नियोजनाबाबत पाहणी करत परिसरातील रस्त्यांवर विविध व्यावसायिक तसेच फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे परिसर बकाल होत असल्याने तत्काळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र अतिक्रमण विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमण कमी होण्याऐवजी वाढले आहे.
स्मार्ट सिटी कामांच्या पाहणीसाठी आयुक्त गमे यांनी अनेकदा गंगाघाट परिसरात पाहणी दौरा केला असून, या पाहणी दौºयादरम्यान गंगाघाटावर दुतोंड्या मारुतीनजीक असलेल्या फळविक्रेत्यांचे अतिक्रमण तसेच गंगाघाटावरील असलेले विविध विक्रेत्यांचे अतिक्रमण तत्काळ हटविण्याबाबत संबंधित अतिक्रमण विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश दिले होते. शिवाय सदरचे अतिक्रमण हटविण्याच्या कामाला विलंब केला, तर संबंधित अधिकाºयांवर कारवाईचे संकेत दिलेले होते. त्यानुसार नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे सुरुवातीला काहीकाळ परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे काम केले गेले, परंतु त्यानंतर आता परिस्थिती ‘जैसे थे’ झाली असून, अतिक्रमणामुळे भाविकांना पायी चालणेदेखील मुश्किल झाले आहे. अनेक विक्रेत्यांनी जागांवर आपला मालकी हक्क सांगण्यास सुरुवात केली असून, या जागांवरून बºयाचदा विक्रेत्यांमध्येच वादही झडत आहेत. मात्र महापालिकेने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.