गंगाधरीत अपघात; दुचाकीस्वार ठार, पोलिसात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 21:55 IST2021-06-04T21:55:16+5:302021-06-04T21:55:37+5:30
गुरुवारी सायंकाळी नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावरील गंगाधरी येथे हा अपघात घडला.

गंगाधरीत अपघात; दुचाकीस्वार ठार, पोलिसात गुन्हा दाखल
नांदगांव (नाशिक) : बोलेरो व पल्सर या दोन वाहनांत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. जखमीला मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावरील गंगाधरी येथे हा अपघात घडला.
डाॅक्टरवाडी येथे दि. ३ रोजी कंदुरीचा कार्यक्रम होता. त्यासाठी समाधान साहेबराव पवार (२६, रा.मानके ता.येवला) हा पल्सर दुचाकीने (क्र.एम एच ४१/बी सी ६९९९) नांदगावकडे येत होते. त्याच सुमारास विरुद्ध दिशेने येणारी बोलेरो (क्र.एम एच ४४ बी १९१) परतीचे मजूर घेऊन चाळीसगांवकडे जात होती. सायंकाळी गंगाधरीजवळ दोघा वाहनात जोरदार धडक झाली. त्यात दुचाकीवरील समाधान पवार हा ठार झाला, तर त्यांच्या पाठीमागे बसलेला अक्षय भाऊसाहेब पवार (१७, रा डॉक्टरवाडी) हा गंभीर जखमी झाला. बोलेरोमधील काही मजूर किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी नांदगाव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखशली पोलीस हवालदार सुरेश सांगळे करीत आहेत.