स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचे गंगापूजन
By admin | Published: May 28, 2015 12:04 AM2015-05-28T00:04:45+5:302015-05-28T00:09:53+5:30
स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचे गंगापूजन
नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने हजारो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत गोदाकाठी गंगापूजन करण्यात आले. अण्णासाहेब मोरे यांनी सपत्नीक गंगा गोदावरी मातेचे पूजन केले.
स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने गेल्या ५0 वर्षांपासून अखंडितपणे गंगापूजनाचा सोहळा होतो. गंगा गोदावरी पुरोहित संघाचे सतीश शुक्ल व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रघोष केला. रामकुंडावरील प्रमुख कार्यक्रमाअगोदर गंगापूररोड येथील उदयनगर श्री स्वामी समर्थ केंद्रातून गंगाजल कलश व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमा असलेल्या सुशोभित रथांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर मुली व महिलांनी सुंदर रांगोळ्या काढल्या. बँड पथक, लेझीम पथक, हाती ध्वज घेतलेले महिला-पुरुष, स्वामींचा व गंगा गोदावरी मातेचा जयघोष करीत मार्गक्रमण करीत होते. उदयनगर, एस.टी. कॉलनी, केटीएचएम कॉलेज, अशोकस्तंभ, मालेगाव स्टॅण्डमार्गे ही मिरवणूक रामकुंडावर आली.
नाशिक महानगराच्या वतीने महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांनीही गंगापूजनात सहभाग घेतला. यानिमित्ताने अण्णासाहेब मोरे यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोदामाई स्वच्छता अभियानाचाही पुनरुच्चार केला.