गंगापूर परिसर : गिरणारेजवळील इंदिरानगर गाळुंशीच्या लोकांची पाण्यासाठी भटकंती धरण उशाशी, कोरड घशाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:35 AM2018-04-08T00:35:14+5:302018-04-08T00:35:14+5:30

गंगापूर : तालुक्यातील इंदिरानगर गाळुंशीच्या ग्रामस्थांना कश्यपीसारख्या धरणाचा शेजार असूनही पाण्याविना वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

Gangapur Campus: Indoor grenadine near the Gir, wandering for the water of the villagers, | गंगापूर परिसर : गिरणारेजवळील इंदिरानगर गाळुंशीच्या लोकांची पाण्यासाठी भटकंती धरण उशाशी, कोरड घशाशी

गंगापूर परिसर : गिरणारेजवळील इंदिरानगर गाळुंशीच्या लोकांची पाण्यासाठी भटकंती धरण उशाशी, कोरड घशाशी

Next
ठळक मुद्देइतरही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रासले मूलभूत सुविधा पुरविता आल्या नसल्याचे चित्र

गंगापूर : तालुक्यातील इंदिरानगर गाळुंशीच्या ग्रामस्थांना कश्यपीसारख्या धरणाचा शेजार असूनही पाण्याविना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाण्याबरोबरच इतरही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रासले आहेत. ग्रामपंचायतीत म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचा आरोप पंचायतीच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी केला आहे. आरोग्य, पाणी, वीज अशा अनेक समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
डोंगरावर वसलेल्या इंदिरानगर गाळुंशी गावाच्या पायथ्याशीच कश्यपी धरण असूनही गाव तहानलेले आहे. गिरणारेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हे ग्रुप ग्रामपंचायतीचे गाव धोंडेगावपासून सन २०१६ मध्ये विभक्त होऊन नवीन ग्रामपंचायतीची स्थापना झाली. गावात दोन हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात सात ग्रामपंचायत सदस्य असूनदेखील शासनाच्या वतीने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविता आल्या नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसते आहे. महिलांना रोज सकाळी पहाटे ३ वाजता उठून दीड किलोमीटर पायी जाऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते. शासनाच्या वतीने या गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. त्यात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीतून पाणी विद्युत मोटारीच्या सहाय्याने टाकीपर्यंत पोहोचवले जाते. परंतु विहिरीतच पाणी शिल्लक
नसल्याने पाणी टाकीत जाणार कसे? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शासनाच्या वतीने एकदाच कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणेकरून ग्रामस्थांना वारंवार या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, अशी मागणी पुढे येत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हरी बेंडकोळी, वामन बेंडकोळी, पांडू पारधी, काशीनाथ येराळे, आभळू बेंडकोळी, निवृत्ती बेंडकोली आदी ग्रामस्थांनी आपली समस्या मांडली.

Web Title: Gangapur Campus: Indoor grenadine near the Gir, wandering for the water of the villagers,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी