गंगापूर धरण ५० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:04 AM2020-07-10T00:04:59+5:302020-07-10T00:29:13+5:30

मागीलवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणे तृप्त झाली आहेत. मेअखेरपर्यंत धरणात जवळपास ३५ टक्के पाणीसाठा होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेला पाऊस आणि त्यानंतर जुलैमध्ये धरणक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणात आताच ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. सन २०१८-२०१९ मध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणातील पाणीसाठा ३८ टक्केइतकाच होता.

Gangapur dam is 50 percent full | गंगापूर धरण ५० टक्के भरले

गंगापूर धरण ५० टक्के भरले

Next
ठळक मुद्देसमाधानकारक : समूहात सुरू झालेल्या पावसाने वाढली पातळी

नाशिक : मागीलवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणे तृप्त झाली आहेत. मेअखेरपर्यंत धरणात जवळपास ३५ टक्के पाणीसाठा होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेला पाऊस आणि त्यानंतर जुलैमध्ये धरणक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणात आताच ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. सन २०१८-२०१९ मध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणातील पाणीसाठा ३८ टक्केइतकाच होता.
गंगापूर धरणसमूहात गंगापूर, कश्यपी, गौतमी-गोदावरी आणि आळंदी या धरणांचा समावेश आहे. समूहातील एकूण पाणीसाठा ३४ टक्के इतका झाला आहे. त्यामध्ये गंगापूर धरणात ५०, कश्यपी धरणात २२, गौतमी गोदावरीत १९ टक्के पाणीसाठा सद्यस्थिती आहे. सध्या फक्त नांदुरमधमेश्वर धरण प्रकल्पातून ८०७ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळपासून येथून विसर्ग करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील पाण्याची तहान भागविणाऱ्या लहान-मोठ्या २४ धरण प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३३ टक्के इतका पाणीसाठा आहे. ६५ हजार ८१८ दलघफू इतकी या प्रकल्पांमध्ये क्षमता असून, सद्यस्थितीत २१ हजार ६३८ इतका उपयुक्त जलसाठा आहे.




गेल्या एक तारखेपासून नांदुरमध्यमेश्वरमधून करण्यात येणारा विसर्ग कमी अधिक प्रमाणात नवव्य दिवशीही कायम आहे.

Web Title: Gangapur dam is 50 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.