गंगापूर, दारणातून विसर्ग

By admin | Published: November 4, 2015 11:51 PM2015-11-04T23:51:40+5:302015-11-04T23:52:30+5:30

नियोजन : १४२७ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीकडे

Gangapur, Durga | गंगापूर, दारणातून विसर्ग

गंगापूर, दारणातून विसर्ग

Next

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केल्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समूहातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जात असून, बुधवार सकाळपर्यंत १४२७ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीकडे रवाना झाले आहे. पाटबंधारे खात्याने कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे याचे नियोजन केल्यामुळे येत्या पंधरा दिवसांत टप्पाटप्प्याने पाणी सोडले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
दोन्ही धरणांतून न्यायालयाच्या निर्णयानुसार पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.त्याकडे त्यांनी पाठ फिरविली असली तरी, त्यानंतर नदीकाठच्या गावांमधील वीजपुरवठा खंडित करणे, पाणी चोरण्याच्या प्रकारांना आळा घालण्याबाबतच्या सूचना वीज व पोलीस खात्याला देण्यात आल्या. गेल्या तीन दिवसांपासून न्यायालयात असलेल्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या पाटबंधारे खात्याने बुधवारपासून पाणी सोडण्याची आपली तयारी पूर्ण केली असून, गंगापूर धरण समूहातून १३५५ दशलक्ष घनफूट तर दारणा समूहातून ४६१३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी वेळापत्रकही तयार करण्यात येऊन गंगापूर धरणातून पाच दिवस तीन हजार क्युसेस व सात दिवस दोन हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. दारणा समूहातूनही तीन, पाच व पंधरा दिवसांपर्यंत जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरणातून पाणी सोडण्यास स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नकार देत आंदोलन सुरू केल्यामुळे तूर्त गंगापूर व गौतमी गोदावरी या दोन धरणांतून पाणी सोडले जात आहे. कश्यपी धरणात ९४५ दशलक्ष घनफूट इतके पाणी आहे.
जिल्हा प्रशासनाने जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबतचा आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असून, पाटबंधारे खात्याला पाण्याची गळती रोखण्याबाबत बजावले आहे. ते रोखण्यासाठी गोदाकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Web Title: Gangapur, Durga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.