गंगापूररोड : २१ दिवसांत देहविक्रयचा तीसरा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:09 PM2019-02-21T17:09:59+5:302019-02-21T17:13:32+5:30

गंगापूर रोडवरील एका व्यावसायिक संकुलात मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला देहविक्रयच्या अड्डयावर पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणाहून पोलिसांनी तीन पीडित तरूणींची सुटका केली आहे.

Gangapur Road: The third house of cattle was destroyed in 21 days | गंगापूररोड : २१ दिवसांत देहविक्रयचा तीसरा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त

गंगापूररोड : २१ दिवसांत देहविक्रयचा तीसरा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त

Next
ठळक मुद्देमंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वरील ठिकाणी छापाजानेवारीपासून ही तीसरी कारवाई

नाशिक : गंगापूररोड परिसरात एका इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात मसार्ज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला देहविक्रयचा व्यवसाय पोलिसांनी बुधवारी (दि.२०) रात्री पुन्हा एका धाड मारून थांबविला. पंधरवड्यानंतर पोलिसांची ही दुसरी तर जानेवारीपासून ही तीसरी कारवाई आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूर रोडवरील एका व्यावसायिक संकुलात मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला देहविक्रयच्या अड्डयावर पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणाहून पोलिसांनी तीन पीडित तरूणींची सुटका केली आहे. दोन महिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका महिलेस अटक केली आहे. जयश्री सोमनाथ अहिरे (३३, रा. उत्तमनगर) व ज्योत्स्ना राजेंद्र नाईक (रा. गंगापूर रोड) अशी संशयित महिलांची नावे आहेत. यातील अहिरे ही मुख्य संशियत असून,नाईक या गाळामालक आहे.
गंगापूररोडवरील रचना कॉम्प्लेक्सच्या तळ मजल्यावरील गाळा क्रमांक ५ व ६मध्ये वीशीतल्या पिडीत तरूणींकडून मसाज पार्लरच्या नावाखाली संशयित अहिरे वेश्या व्यवसाय करवून घेत होती. याबाबतची गोपनीय माहिती गंगापूर पोलिसांना मिळताच त्यांनी मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वरील ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात तीन पीडित तरूणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले. कॉलेजरोड, गंगापूररोड, महात्मानगर या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसराला मसाजपार्लर व स्पाच्या नावाखाली चोरीछुप्या पद्धतीने देहविक्रय व्यवसायाचा ‘डाग’ लागला आहे. दिवसेंदिवस या भागात हा व्यवसाय फोफावत चालल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून अशा अवैध व्यवसायांवर छापे मारले जात असतानाही संबंधितांकडून सर्रासपणे या भागात राजरोस देहविक्रयचा व्यवसाय चालविण्याचे धाडस कोणाच्या आशीर्वादाने केले जाते? असा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

२१ दिवसांत तीन अड्यांवर छापेमारी
गंगापूररोडवरील एसटी कॉलनीच्या परिसरात असलेल्या एका इमारतीच्या दुसºया मजल्यावरील सदनिकेत एका मसाजपार्लरमध्ये युवतींकडून बळजबरीने देहविक्रयचा व्यवसाय सुरू होता. यानुसार पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी छापा मारला होता. तसेच ४ फेबु्रवारी रोजी जुना गंगापूरनाका परिसरातील एका अपार्टमेंटच्यासदनिकेत साडी विक्रीच्या व्यवसायासाठी एकत्र येत आल्याचा बनाव करत देहविक्रयचा व्यवसाय राजरोसपणे चालविणा-या महिला, पुरूष दलालांना पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी मंगळवारी अशाच पध्दतीची कारवाई करत देहविक्रयचा व्यवसाय रोखला.

Web Title: Gangapur Road: The third house of cattle was destroyed in 21 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.