आता नाशिकरोडला पोहोचणार गंगापूरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:42 AM2019-01-19T00:42:23+5:302019-01-19T00:43:34+5:30

नाशिकरोड विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील पाणी आटल्याने चेहेडी येथील बंधारा कोरडा पडला असून त्यामुळे पाणी उपसा घटला आहे. त्यामुळे शनिवारपासून (दि.१९) बहुधा गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजनेद्धारे या भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. अशाप्रकारची स्थिती यापूर्वी २०१६ मध्येदेखील उद््भवतली होती.

Gangapur water will reach Nashik Road now | आता नाशिकरोडला पोहोचणार गंगापूरचे पाणी

आता नाशिकरोडला पोहोचणार गंगापूरचे पाणी

Next
ठळक मुद्देउपाययोजना : चेहेडी बंधारा कोरडाठाक

नाशिक : नाशिकरोड विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील पाणी आटल्याने चेहेडी येथील बंधारा कोरडा पडला असून त्यामुळे पाणी उपसा घटला आहे. त्यामुळे शनिवारपासून (दि.१९) बहुधा गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजनेद्धारे या भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. अशाप्रकारची स्थिती यापूर्वी २०१६ मध्येदेखील उद््भवतली होती.
नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होत असला तरी नाशिकरोड विभागातील दारणाचे पाणी दिले जाते. चेहेडी येथे त्यासाठी बंधारा बांधण्यात आला असून, तेथे दारणाचे पाणी अडवून त्यातून पाणी उपसा केला जातो.
पण पाणी नसेल तर...
महापालिकेला जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाने पाणी आरक्षण करताना गंगापूर धरणातून मागणीपेक्षा शंभर दश लक्ष घन फूट आरक्षण कमी करून दारणामध्ये जादा आरक्षण दिले आहे. दारणा धरणातून एकूण ४०० दशलक्षघनफूट आरक्षण देण्यात आले आहे. तथापि, धरणातील पाणी स्थिती कमी झाल्यास आरक्षण असून काय उपयोग? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Gangapur water will reach Nashik Road now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.