गंगापूर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:17 AM2018-08-02T01:17:23+5:302018-08-02T01:18:13+5:30

नाशिक : आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्णात पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्णातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही आता वरुणराजा रुसला आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ७६.४५ टक्के इतका असून ४ हजार ३०४ दलघफूपर्यंत जलपातळी पोहचली आहे. पावसाने धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात विश्रांती घेतल्याने विसर्ग आता पूर्णपणे थांबविण्यात आला आहे.

 Ganges dam is completely closed | गंगापूर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद

गंगापूर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद

Next
ठळक मुद्देपावसाची दडी : धरणातील जलसाठा ७६.४६ टक्क्यांवर

 

 

नाशिक : आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्णात पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्णातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही आता वरुणराजा रुसला आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ७६.४५ टक्के इतका असून ४ हजार ३०४ दलघफूपर्यंत जलपातळी पोहचली आहे. पावसाने धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात विश्रांती घेतल्याने विसर्ग आता पूर्णपणे थांबविण्यात आला आहे.
पावसाचे प्रमाण शहरासह जादा पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही घटले असून, शहरात पूर्णपणे पावसाने विश्रांती घेतली आहे. सोमवारपर्यंत ४०० ते ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूरमधून केला जात होता; मात्र जलसंपदा विभागाने बुधवारी (दि.१) हा विसर्गही पूर्णपणे बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गंगापूर धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच अहमदनगर जिल्ह्णातील काही तालुक्यांनाही पाणी पुरविले जाते. हे धरण ७६ टक्के भरले असून, पाण्याची आवक धरण समूहात थांबल्याने गंगापूर धरणाचा विसर्ग पूर्णत: बंद करण्यात आला आहे. गंगापूर धरण समूहात काश्यपी, गौतमी, अंबोली ही लहान धरणे आहेत. या धरणांमधून गंगापूर धरणात सुरू असलेला पाण्याचा प्रवाहही पूर्णपणे थांबविला गेला आहे. काश्यपी धरण ८५ टक्के, गौतमी धरण ७१.३८ टक्के भरले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी पहाटे सहा वाजेपर्यंत २४ तासांत ०.५ मिमी पावसाची नोंद झाली. अंबोलीच्या परिसरात १६, त्र्यंबकेश्वरमध्ये ०.२ मिमी इतका पाऊस झाला. यावरून पावसाचे प्रमाण अचानकपणे कमी झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.शहर व परिसरात आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास शहरात ढग दाटून येत असले तरी पावसाच्या सरींचा वर्षाव होत नाही. शहरात या हंगामात अद्याप ४३१ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे.

Web Title:  Ganges dam is completely closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण