...अनेकविध समस्यांच्या विळख्यात ‘गंगोत्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 12:01 AM2020-09-08T00:01:53+5:302020-09-08T01:32:56+5:30
नाशिक : पावसाचे पाणी थेट घरात... निवासस्थानांना चहुबाजूंनी रानगवताचा विळखा... सर्प, किडे, अळ्या अन् डासांचे साम्राज्य... ड्रेनेजचा अभाव...घरांच्या छतांवर गाजरगवताचे लॉन्स अन् वीस वर्षे जुनी वायरिंग अशा एक ना अनेक समस्यांचा विळखा जलसंपदा विभागाच्या द्वितीय, तृतीय श्रेणींमधील कर्मचारी वास्तव्यास असलेल्या ‘गंगोत्री’ या शासकीय वसाहतीला वर्षानुवर्षांपासून पडलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पावसाचे पाणी थेट घरात... निवासस्थानांना चहुबाजूंनी रानगवताचा विळखा... सर्प, किडे, अळ्या अन् डासांचे साम्राज्य... ड्रेनेजचा अभाव...घरांच्या छतांवर गाजरगवताचे लॉन्स अन् वीस वर्षे जुनी वायरिंग अशा एक ना अनेक समस्यांचा विळखा जलसंपदा विभागाच्या द्वितीय, तृतीय श्रेणींमधील कर्मचारी वास्तव्यास असलेल्या ‘गंगोत्री’ या शासकीय वसाहतीला वर्षानुवर्षांपासून पडलेला आहे.
त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाला लागून असलेल्या गंगोत्री वसाहतीत विविध नागरी सोयीसुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येते. वारंवार अर्जफाटे करूनसुद्धा संबंधित खात्याच्या निर्धावलेल्या अधिकारीवर्गाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने या वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरमहा देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येकी आठशे ते नऊशे रुपये पगारातून कपात केली जात असली तरीदेखील वसाहतीची कुठल्याही प्रकारची देखभाल संबंधित विभागाकडून होत असल्याचे सद्य:स्थितीत असलेल्या अवस्थेवरून स्पष्ट होते.
एक मजली वसाहतीत एकूण ३२ ते ३५ सदनिका उभारण्यात आल्या आहेत. या सदनिकांमध्ये मागील दहा ते पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळापासून कर्मचारी आपापल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सध्या वर्ग-२ व वर्ग-३चे कर्मचारी येथे राहत असून, त्यांचे २० ते २५ कुटुंबे आहेत. वर्षाकाठी देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होत असला तरी त्याचा कुठलाही लाभ ‘गंगोत्री’ला अद्याप मिळालेला नाही. यामुळे गंगोत्रीला मागील आठ ते दहा वर्षांपासून लागलेले समस्यांचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही.टेंडर निघाले तर मग गेले कोठे?‘‘गंगोत्री’ला लागलेले विविध समस्यांचे ग्रहण सुटावे, कर्मचाºयांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी लाखो रुपयांचे टेंडर दोन वर्षांपूर्वी काढले गेले, मात्र त्या टेंडरपैकी ना बगीचा झाला, ना रस्ते, ना इमारतींची दुरुस्ती; तर मग टेंडर गेले कुणीकडे? असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.सदनिकांना गळती अन् वारंवार शॉर्टसर्किट‘गंगोत्री’च्या नशिबी आलेल्या विविध समस्यांपैकी एक म्हणजे येथील इमारतींचा रंग अन् विविध सदनिकांमध्ये गळणारे पावसाचे पाणी. यामुळे कर्मचारी हैराण झाले आहेत. घरांमधील वायरिंग जुनाट झाल्याने वारंवार शॉर्टसर्किट होते, यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. वसाहत केवळ नावाला असून, या वसाहतीत रस्ते नाही अन् सदनिकांमधील शौचालय, बाथरूमचीसुद्धा पुरती वाट लागल्याचे चित्र आहे.