गंजमाळ परिसर नागरी सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:36 AM2019-06-04T00:36:01+5:302019-06-04T00:36:19+5:30

गंजमाळ परिसरातील भीमवाडी, पंचशीलनगर, म्हसोबावाडी, श्रमिकनगर या भागात तुंबलेल्या गटारी, बंद असलेले पथदीप, अपुरा पाणीपुरवठा, घंटागाडीची अनियमितता व शौचालयांची दुरवस्था आदी समस्या गंभीर बनल्या आहेत.

 Ganjamal campus is deprived of urban facilities | गंजमाळ परिसर नागरी सुविधांपासून वंचित

गंजमाळ परिसर नागरी सुविधांपासून वंचित

Next

नाशिक : गंजमाळ परिसरातील भीमवाडी, पंचशीलनगर, म्हसोबावाडी, श्रमिकनगर या भागात तुंबलेल्या गटारी, बंद असलेले पथदीप, अपुरा पाणीपुरवठा, घंटागाडीची अनियमितता व शौचालयांची दुरवस्था आदी समस्या गंभीर बनल्या आहेत. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या भागातील रहिवाश्यांना अजूनही मूलभूत नागरी सुविधांपासून दूरच रहावे लागते आहे.
वाढत्या अस्वच्छतेमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गंजमाळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी पुनर्वसनाच्या नावाखाली त्यांची घरे रिकामी करून त्यांना काही वर्षांपूर्वी एसटी महामंडळाच्या गंजमाळ बस डेपोत स्थलांतरित करण्यात आले. मात्र अद्यापही येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनास यश आलेले नाही. लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासन यांचा समन्वय नसल्याने कदाचित नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असावे, असे मत येथील रहिवासी राहुल सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे.
गंजमाळ हा भाग जुने नाशिक परिसरात मोडतो, याभागातून आतापर्यंत निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे महापौर, स्थायी समिती सभापती, प्रभाग समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती अशा अनेक महत्त्वाच्या पदांपर्यंत पोहोचले.परंतु परिसरातील समस्या कायम आहेत असे शालूमन लांडगे व ज्योती पाटील यांनी सांगितले. श्रमिकनगर, पंचशीलनगर व म्हसोबावाडी येथील नागरिकांच्या शौचालयाचा प्रश्न गंभीर असून, तुटलेले ढापे व उघड्या फरश्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरते,शौचालयांची नियमित स्वच्छता व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरु ण मोरे यांनी केली. म्हसोबावाडी येथील उद्यान विकसित करून त्याची निगा राखावी तसेच परिसरात ग्रीन जिम उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवास मोरे यांनी केली. परिसरातील अनेक विद्युत दिवे बंद असून विद्युत तारा भूमिगत कराण्याची गरज गोदाबाई जाधव यांनी व्यक्त केली. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने परिसरात कचºयाचे ढीग वाढले आहेत. पावसापूर्वी नालेसफाई व्हावी, असे जावेद शेख व आसिफ पठाण यांनी सांगितले.
आरोग्याचा प्रश्न गंभीर
अपुºया जागेत रहिवाश्यांना आपले जीवन जगणे कठीण होत असून, अरु ंद रस्ता, बंद पथदीप व उघड्यावरील गटारी यामुळे नागरिक त्रस्त झालेले असून, लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात डास निर्मूलन फवारणीदेखील वेळोवेळी होत नाही.

Web Title:  Ganjamal campus is deprived of urban facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.