गंजमाळला दोन गटांत तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:23+5:302021-05-26T04:14:23+5:30
सोमवारी मध्यरात्री अचानकपणे भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील गंजमाळ येथील पोलीस चौकीसमोर येथील रहिवासी शेख कुटुंबाच्या दारात येऊन जुन्या भांडणाची ...
सोमवारी मध्यरात्री अचानकपणे भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील गंजमाळ येथील पोलीस चौकीसमोर
येथील रहिवासी शेख कुटुंबाच्या दारात येऊन जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्या घरातील दोघा तरुणांना बाहेर काढत टोळक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काहींच्या हातात कोयत्यासारखे धारधार शस्त्रे होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. गंजमाळ येथे मोठा जमाव जमला असून, हाणामारी होत असल्याची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी जमलेल्या जमावाला लाठ्यांचा प्रसाद देत पांगविण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. रईस खुर्शीद शेख (४२), जावेद खुर्शीद शेख (३२) हे दोघे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. रईस याने दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी मुज्जा उर्फ नितीन हिवाळे, संदीप गुलाब दाढेकर, सचिन गायकवाड, गणेश चंद्रकांत मोरे, आझाद मुकेश पाथरे, अनुराग उत्तम सहेजराव, रोहित डोके व त्यांचे तीन साथीदार यांच्याविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आझाद व अनुराग या दोघांना अटक केली आहे. फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यामध्ये काही अल्पवयीन गुन्हेगारांचाही सहभाग असल्याचे तपासात पुढे येत आहे.