ब्राह्मणगाव शाळेत ‘गाव तेथे वाचनालय’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:25 PM2020-09-10T23:25:58+5:302020-09-11T00:52:11+5:30
ब्राह्मणगाव : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ‘गाव तेथे वाचनालय’ व ‘डोनेट ए डिव्हाईस’ या उपक्रमाचा शुभारंभ सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद बापू अहिरे यांचे हस्ते करण्यात आला.
ब्राह्मणगाव : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ‘गाव तेथे वाचनालय’ व ‘डोनेट ए डिव्हाईस’ या उपक्रमाचा शुभारंभ सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद बापू अहिरे यांचे हस्ते करण्यात आला. शाळेलगतच्या वगर्खोलीचे सुशोभिकरण करून सुसज्ज ‘गाव तेथे वाचनालय’ या दालनाची निर्मिती करण्यात आली. इयत्ता १ ते ४ च्या विद्यार्थ्यांना सहज,सोपे व मनोरंजनात्मक अशी अनेक वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले. डोनेट ए डिव्हाईस या उपक्रमांतर्गत शालेय व्यवस्थापन समिति अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी शाळेसाठी स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही आज शाळेसाठी दिला . दालनाचे उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद बापू अहिरे यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास काकळीज, सुभाष अहिरे, विनोद अहिरे, नरेंद्र अहिरे, गुलाब खरे, हिरामण नवरे, नानाजी अहिरे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील निकम यांनी केले.