ग्रामपंचायतीने राबविले पाणीबचतीचे धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 10:35 PM2017-07-30T22:35:30+5:302017-07-30T22:37:46+5:30
पाणी शुद्ध केल्यानंतर खराब समजले जाणारे पाणी बहुतेकदा फेकून देण्यात येते; परंतु पिंंपळगाव ग्रामपंचायतीने एक विशेष उपक्रम राबवून हे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला असून, त्यात त्यांना यश आले आहे. यात पाण्याची बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. रोज सुमारे अडीच लाख लिटर पाणी सोडून दिले जात होते. आता या नवीन संकल्पनेमुळे अवघे तीस हजार लिटर पाणी सोडले जात आहे.
पिंपळगाव बसवंत : पाणी शुद्ध केल्यानंतर खराब समजले जाणारे पाणी बहुतेकदा फेकून देण्यात येते; परंतु पिंंपळगाव ग्रामपंचायतीने एक विशेष उपक्रम राबवून हे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला असून, त्यात त्यांना यश आले आहे. यात पाण्याची बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. रोज सुमारे अडीच लाख लिटर पाणी सोडून दिले जात होते. आता या नवीन संकल्पनेमुळे अवघे तीस हजार लिटर पाणी सोडले जात आहे. हे तीस हजार लिटर पाणी संपूर्ण गाळमिश्रित असल्याने ते सोडले जात आहे. जलशुद्धिकरण केंद्रात पाणी शुद्ध केल्यानंतर त्या टाकीला तळाशी साचलेला गाळ, अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करावा लागत होता. यानंतर ते पाणी उताराच्या दिशेने सोडून दिले जात होते. या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग होत नव्हता. या पाण्याचे पुन्हा शुद्धिकरण होत नव्हते. पाच कोटी लिटर पाणी असे वाया जात होते. ही बाब लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्य भास्कर बनकर यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या ही बाब लक्षात आणून दिली. रोज वाया जाणारे पाणी कसे वाचवायचे याबद्दल ग्रामपंचायतीने उपक्रम राबवायचे ठरविले. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात तर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी बघून पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष भास्कर बनकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदावरे यांच्याशी चर्चा केली. ग्रामपंचायतीचे सकारात्मक धोरण शुद्धिकरणाच्या टाक्या धुतल्यानंतर सोडून दिल्या जाणाºया पाण्याचा पुनर्वापर करता येणे शक्य असल्याची बाब ग्रामपंचायत सदस्य भास्कर बनकर व ग्रामसेवक लिंगराज जंगम यांच्या लक्षात आली असता हा पाणी वाचवा प्रकल्प उभा कसा करायचा, हा प्रश्न डोळ्यासमोर होता. कारण सरकारच्या सध्याच्या योजनांमध्ये तरतूद नसल्याचेही स्पष्ट होत होते. ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट येत असल्याने भास्कर बनकर यांनी ग्रामपंचायतीसमोर हा प्रस्ताव ठेवला.
ग्रामपंचायतीनेही सकारात्मक विचार करून पाणीपुरवठा विभागाकडून त्याची तांत्रिक मान्यता घेतली व १९ लाख रु पये खर्च करून केंद्राबाहेर टाकल्या जाणाºया पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा उभारली.
यासाठी त्यांनी दोन लाख लिटर क्षमतेची भूमिगत टाकी उभारली. व तेथूनच शुद्धिकरण केंद्राच्या स्वच्छतेनंतर ते अशुद्ध पाणी या टाकीत सोडले जाते. तेथे या पाण्यातील मातीचे कण तळाशी गेल्यावर ते पाणी पुन्हा शुद्धिकरण केंद्रात सोडले जाते व ते पुन्हा शुद्ध करून पिंपळगावच्या जलकुंभात सोडले जाते.