गॅरेज व्यावसायिकांचे रस्त्यावरच अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:22 AM2017-10-30T00:22:26+5:302017-10-30T00:22:33+5:30

कोणत्याही मार्गावरील वाहतूक सरळ जाणे अपेक्षित असताना इंदिरानगर परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच पार पाडावी लागते. पेठेनगर कॉर्नर ते संत नरहरी चौक यादरम्यान असलेल्या गॅरेजधारकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय करण्याबाबत कोणाचे दुमत नाही, मात्र वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय केला तर कसे होणार हा खरा प्रश्न आहे.

 Garage professionals encroach on the road | गॅरेज व्यावसायिकांचे रस्त्यावरच अतिक्रमण

गॅरेज व्यावसायिकांचे रस्त्यावरच अतिक्रमण

Next

संजय शहाणे ।
इंदिरानगर : कोणत्याही मार्गावरील वाहतूक सरळ जाणे अपेक्षित असताना इंदिरानगर परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच पार पाडावी लागते. पेठेनगर कॉर्नर ते संत नरहरी चौक यादरम्यान असलेल्या गॅरेजधारकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय करण्याबाबत कोणाचे दुमत नाही, मात्र वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय केला तर कसे होणार हा खरा प्रश्न आहे.  महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाहतूक पोलीस किंवा महापालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरांच्या मुख्य रस्त्यांप्रमाणेच अन्य वसाहती, शाळा तेथील व्यवसाय या सर्वांचा विचार करून एकूणच वाहतुकीचे नियोजन करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.  इंदिरानगरमध्ये दिवसागणिक लोकवस्ती वाढत आहे. त्याचबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरात ये-जा करण्यासाठी पेठेनगर रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. संत नरहरी चौक ते पेठेनगर कॉर्नर यादरम्यान चारचाकी वाहनांची तीन ते चार गॅरेज आहेत.
संबंधित गॅरेजमध्ये ट्रक, कार आणि अन्य चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात दुरु स्तीसाठी येत असल्याने जागेअभावी पेठेनगर रस्त्यावरच सर्रासपणे तासन्तास वाहनांची दुरुस्ती सुरू असते. रस्त्यावरच ट्रक किंवा मोटारी उभ्या करून दुरुस्ती केली जात असल्याने रस्ता अरुंद होतो, कित्येकदा समोरून येणारे वाहनही दिसत नाही. त्यामुळे अपघातही घडत असतात. मोटार गॅरजेमुळे त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्र मण करणे जिकिरीचे बनले आहे. दररोज लहान-मोठे अपघात घडून हमरीतुमरीचे प्रकार घडत आहेत. तातडीने रस्त्यावरील वाहन दुरु स्ती थांबवून वाहतुकीस रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या वतीने वाहतूक नियोजनाच्या बाबतीत शहराचा मध्यभाग किंवा उपनगरांच्या मध्यवर्ती भागावरच भर दिला जातो. इंदिरा नगर, पेठेनगर, सार्थकनगर, वडाळा-पाथर्डी रोड अशा ठिकाणी काय सुरू आहे, तेथील वाहतुकीचे तीन तेरा वाजत असेल तर काय केले पाहिजे याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाही. परिणामी नवविकसित भागात वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करीत असून, त्यावर उपाय करण्याची गरज आहे.

Web Title:  Garage professionals encroach on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.