नवरात्रोत्सवासाठी गरबा, दांडियाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:20 AM2019-09-28T00:20:25+5:302019-09-28T00:20:46+5:30

आठ दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवासाठी शहरात गरबा, दांडिया नृत्याच्या तयारीला वेग आला असून, यासाठी शहरातील अनेक भागांत गरबासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत.

 Garba, Dandiya get ready for Navratri festival | नवरात्रोत्सवासाठी गरबा, दांडियाच्या तयारीला वेग

नवरात्रोत्सवासाठी गरबा, दांडियाच्या तयारीला वेग

Next

नाशिक : आठ दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवासाठी शहरात गरबा, दांडिया नृत्याच्या तयारीला वेग आला असून, यासाठी शहरातील अनेक भागांत गरबासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. या प्र्रात्यक्षिकांना तरुण-तरुणींचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. घरोघरी होणारी घटस्थापना, तसेच सार्वजनिक मंडळांतर्फेघेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या असल्याचे आढळून आले.
नवरात्रोत्सवात सार्वजनिक मंडळे तसेच अनेक संस्था गरबा स्पर्धेचे आयोजन करत असतात. यासाठी शहरातील विविध भागांत गरबा प्रात्यक्षिकांचे शिबिर भरण्यात आले आहे. या काळात तरुण-तरुणींचा उत्साह मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो. यासाठी तरुणाईकडून बाजारात गरबा खेळण्यासाठी लागणाºया साहित्यांची खरेदीसाठी बाजारात आतापासूनच गर्दी बघायला मिळत आहे. बाजारात यासाठी विविध प्रकारच्या दांडिया, गरबा खेळण्यासाठी लागणारे कपडे, टोप, तरुणींसाठी लागणारे अलंकार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात यंदाचा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होण्याची चिन्हे आहे.
बाजारात गरब्याचे साहित्य दाखल
नवरात्रोत्सवात तरुण-तरु णींचा उत्साह शिगेला पोहोचतो. तसेच उत्सवात अनेक मंडळे, संस्था गरबा, दांडियाच्या स्पर्धा आयोजित करत असतात. त्यासाठी तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळतो. गरबा, दांडिया खेळण्यासाठी लागणारे साहित्य, कपडे खरेदीला या दिवसांत मागणी वाढत असल्यामुळे बाजारात आताच साहित्य उपलब्ध झाले आहे. यात निरनिराळ्या प्रकारच्या दांडिया, गुजराथी-मारवाडी प्रकारचे कपडे बाजारात बघायला मिळत आहे. यामध्ये दांडियाची जोडी ४० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. तसेच गरबा, दांडिया खेळण्यासाठी लागणारे कपडे बाजारात भाड्याने मिळत असून, एक दिवासाला १५० रुपयांपासून पुढे भाडे आकारले जात आहे.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गरबा प्रशिक्षणाची कार्यशाळा सुरू आहे. यात तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. गरबामध्ये हिंच, दोडियो, पोपटीयो, टिटाडा दोन ताली, छगडी, रास गरबा या प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते.
- महेंद्र ठाकूर, गरबा प्रशिक्षक

Web Title:  Garba, Dandiya get ready for Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.