नांदेसर येथे घंटागाडीचा लोकार्पण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:13 AM2018-03-22T00:13:40+5:302018-03-22T00:13:40+5:30
तालुक्यातील नांदेसर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने घेतलेल्या घंटागाडीचे लोकार्पण, येथील प्राथमिक शाळेत डिजिटल वर्गांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठी खेळणी भेट देण्यात आली.
येवला : तालुक्यातील नांदेसर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने घेतलेल्या घंटागाडीचे लोकार्पण, येथील प्राथमिक शाळेत डिजिटल वर्गांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठी खेळणी भेट देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड होते. याप्रसंगी घंटागाडीचे लोकार्पण व डिजिटल वर्गांचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी सुनील आहिरे, ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. गावातील समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावासाठी १५ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. तसेच अंगणवाडीच्या नवीन इमारतीसाठीही निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालू आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड यांनी केले. गावात ठिकठिकाणी २५ कचराकुंड्या ठेवून या घंटागाडीद्वारे दररोज गावातील घनकचरा गोळा केला जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संगणक संच देण्यात आला. गटविकास अधिकारी आहिरे यांनी मार्गदर्शन केले. सम्राट वर्मा यांनी गावासाठी १० कचरा कुंड्या व पाच बसण्याची बाके दिल्याने त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन महाजन व ग्रामसेविका पवार यांनी केले. याप्रसंगी सरपंच सुभाष वाघ, उपसरपंच विजय वाघ यांनी भविष्यात गावात राबविण्यात येणारी कामे व योजनांची माहिती दिली.
कार्यक्र म यशस्वीतेसाठी संगीता वाघ, उज्ज्वला वाघ, विमल कोकाटे, मंदा मढवे, राजू बेंडके, मुनीर अहमद शेख, कैलास जारवर, शिरीष सूर्यवंशी, मच्छिंद्र वाघ, शिवाजी वाघ, अमोल बेंडके, सुनील कोकाटे व येथील जगदंबा ग्रुपने परिश्रम घेतले.