‘गार्बेज एटीएम’ मधून करा कचरा संकलन

By Admin | Published: September 15, 2016 12:36 AM2016-09-15T00:36:10+5:302016-09-15T00:50:10+5:30

पॉइण्ट रिडीमने मोबाइल रिचार्ज : शॉपिंग करणेही होते सहज शक्य

Garbage collection from Garbage ATM | ‘गार्बेज एटीएम’ मधून करा कचरा संकलन

‘गार्बेज एटीएम’ मधून करा कचरा संकलन

googlenewsNext

पंतप्रधान मोदींनी साद घातलेल्या ‘स्वच्छ अभियान’ उपक्रमाला साद देत संदीप फाउंडेशन महाविद्यालयातील विद्युत शाखेतील विद्यार्थ्यांनी कचरा संकलनासाठी अनोख्या एटीएम प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाअंतर्गत कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला विशिष्ट पॉइण्ट प्राप्त होणार असून या पॉइण्टद्वारे शॉपिंग, मोबाइल रिचार्ज करणे सहज शक्य होणार आहे.
संदीप फाउंडशेन महाविद्यालयातील विद्यार्थी यश गुप्ता, प्रकाश सोनवणे, राहुल पाटील आणि ऋ षिकेश कासार यांनी हा प्रकल्प साकारला असून या विद्यार्थ्यांना कृतिका अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. या गार्बेज एटीएममध्ये कचरा टाकण्यासाठी कार्ड उपलब्ध करून देण्यात येते आणि या कार्डमध्ये कचरा टाकल्यानंतर पॉइण्ट जमा होत जातात. या कचरा संकलनातून पॉइण्ट मिळत असल्याने इतस्त: कचरा फेकण्याचे प्रमाण कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे जास्तीत जास्त कचरा संकलन होण्यास मदत होणार असून पर्यायाने परिसर स्वच्छ होण्यास मदत होईल, परिसर स्वच्छ असल्याने आपोआपच रोगराई तसेच आजार कमी होण्यास मदत होणार आहे. विविध पातळीवर या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवल्यास गाव, शहर, राज्य, देश स्वच्छ होण्यास हातभार लागून स्वच्छ आणि शुद्ध हवा तयार होऊन प्रसन्न वातावरण निर्मितीस चालना मिळणार आहे.
या प्रकल्पाला राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता तसेच जवाहर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्र मांक, तर शताब्दी इन्स्टिट्यूट येथील स्पर्धेत द्वितीय, औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या कचरा संकलनातून भरलेले गार्बेज एटीएम रिकामे होण्यासाठी घंटागाडीची सुद्धा व्यवस्था करता येणे सहज शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी पेटंट मिळावे यासाठी मुंबईला अर्जदेखील दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Garbage collection from Garbage ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.