कचरा डेपोला तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:28 PM2017-09-07T23:28:43+5:302017-09-08T00:13:52+5:30
गेल्या ४० वर्षांपासून वडगाव बल्हे भागात असणारा येवला नगर परिषदेचा कचरा डेपो तत्काळ हटवून पर्यायी कचरा डेपोची व्यवस्था येवला पालिकेने करावी यासाठी वडगाव बल्हे येथील सरपंचासह सर्वच ग्रामस्थांनी येवला पालिकेसमोर गुरुवारपासून (दि. ७) आमरण उपोषणास सुरुवात केली. दरम्यान उशिरा पालिकेने समाधानकारक पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. पालिकेने ठोस कार्यवाही केली नाही तर रास्ता रोकोचा इशारा वडगाव ग्रामस्थांनी दिला आहे.
येवला : गेल्या ४० वर्षांपासून वडगाव बल्हे भागात असणारा येवला नगर परिषदेचा कचरा डेपो तत्काळ हटवून पर्यायी कचरा डेपोची व्यवस्था येवला पालिकेने करावी यासाठी वडगाव बल्हे येथील सरपंचासह सर्वच ग्रामस्थांनी येवला पालिकेसमोर गुरुवारपासून (दि. ७) आमरण उपोषणास सुरुवात केली. दरम्यान उशिरा पालिकेने समाधानकारक पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. पालिकेने ठोस कार्यवाही केली नाही तर रास्ता रोकोचा इशारा वडगाव ग्रामस्थांनी दिला आहे.
ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून उपोषणा-बाबत मध्यस्थी करण्याची भूमिका निभावली. हुडको वसाहतीच्या निर्मितीसाठी १९८० पासून येवल्याचा कचरा डेपो वडगाव बल्हे शिवारातील सुमारे साडेपाच एकर जमिनीवर हलवला आहे. कचºयापासून होणारे खत आपल्या शेतीला उपयोगी ठरेल, अशा आश्वासनाने येथे कचरा डेपो सुरू झाला. याच वडगाव बल्हे येथील गट नंबर १९ मध्ये अडीच हेक्टर क्षेत्रात येवला नगर परिषद शहराचा कचरा गेल्या अनेक वर्षापासून आणून टाकत आहे. तेव्हापासून शहराचा कचरा येथे साठवला जात आहे. नगरपालिकेस गावकºयांनी गेल्या ३७ वर्षांपासून सहकार्य केले आहे. परंतु आता हा त्रास लोकांना सहनशीलतेपलीकडे गेला आहे. ग्रामस्थ प्रत्येक ग्रामसभेच्या वेळेस सरपंच व ग्रामसेवक यांना वेठीस धरीत असून, कामकाज बंद पाडत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही कचरा डेपो हटवला जात नाही. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी शेख यांना दिलेल्या निवेदनाला महिना उलटून गेला तरी कार्यवाही होत नाही. नगरपालिकेने आतापर्यंत याबाबत काहीही केले नाही. त्वरित निर्णय घेऊन कचरा डेपोची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. या गावातील ग्रामस्थांना कचरा डेपोपासून होणारा त्रास थांबवावा. कचरा डेपो न हटवल्या गेल्यास रस्त्यावर कचरा फेकून रहदारी बंद करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. येवला पालिकेच्या बाहेर सरपंच मीराबाई कापसे, उपसरपंच हर्षदा पगारे, वंदना कापसे, आशा जाधव, बाळासाहेब कापसे, अशोक जाधव, छाया मोरे, सुमन कापसे, जिजाबाई जाधव, मथुरा गायकवाड, अनिल मोरे, गणेश कापसे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत. अशोक पैठणकर, जितेश पगारे, भास्कर संसारे, नितीन संसारे, कृष्णदास जमधडे, संजय पवार यांनी उपोषणात सहभाग घेतला.