कामगारनगरात साचला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:14 AM2021-02-12T04:14:06+5:302021-02-12T04:14:06+5:30
नाशिक : शहरात काहीसी थंडी जाणवत असली तरी दुपारी ऊनही पडत आहे. वातावरणातील गारवा कायम असला तरी ठिकठिकाणी उसाची ...
नाशिक : शहरात काहीसी थंडी जाणवत असली तरी दुपारी ऊनही पडत आहे. वातावरणातील गारवा कायम असला तरी ठिकठिकाणी उसाची गुऱ्हाळे सुरू देखील झाली आहेत. महामार्ग तसेच शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कडेला लाकडी गाड्यांवर उसाचे गुऱ्हाळ सुरू झाल्याचे दिसते.
देवळाली गावातील बाजार रस्त्यावर
नाशिक : नाशिक रोड देवळाली गावातील आठवडी बाजार दिवसेंदिवस वाढत असून, बाजार आता अंतर्गत रसत्यावरही भरू लागला आहे. या परिसराचा विस्तार झाल्याने शेतकरी आपला माल सोमवारच्या बाजारात आणू लागले आहेत. बाजारात तसेच बाजारातील रस्त्यांवर नागरिकांना भाजीपाला उपलब्ध होत आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय रस्त्याची डागडुजी
नाशिक : नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे माती आणि मुरूम टाकून बुजविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गाची डागडुजी करण्यात आली. अजूनही अनेक ठिकाणी रस्ता नादुरुस्तच आहे.
गंगापूर नाका रोडवर वाहनांचा अडथळा
नाशिक : गंगापूर नाका ते विद्याविकास सर्कलदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या राहणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या मार्गावर अनेक खाद्यपदार्थांची दुकाने असल्याने याठिकाणी थांबणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावेळी रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने अन्य वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे.
शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ
शहरात घरफोडीच्या घटना सुरूच
नाशिक : शहरात दुचाकी चोरी तसेच घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. घरासमोर तसेच इमारतींच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करत आहेत. काही घटनांमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या दुचाकीही चोरीला गेल्या आहेत. या चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.