नांदगावी बागेत लागलेल्या आगीत झाडे, वनस्पती जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:07 AM2018-05-07T01:07:27+5:302018-05-07T01:07:27+5:30

नांदगाव : अज्ञात इसमाने फेकलेली जळती सिगारेट, विडी अशा तत्सम अग्निजन्य वस्तूमुळे शनिमंदिराजवळील बागेला आग लागून येथील अनेक झाडे व वनस्पती जळून खाक झाल्याची घटना घडली. गेल्या वर्षी अशाच प्रकारे बागेच्या पश्चिम कोपऱ्यात आग लागल्याची घटना घडली होती. शहरातील आबालवृद्धांचे हे एकमेव विरंगुळ्याचे ठिकाण आहे.

In the garden of Nandagavi, the plants burned, the plants burned | नांदगावी बागेत लागलेल्या आगीत झाडे, वनस्पती जळून खाक

नांदगावी बागेत लागलेल्या आगीत झाडे, वनस्पती जळून खाक

Next
ठळक मुद्देशहरातील आबालवृद्धांचे हे एकमेव विरंगुळ्याचे ठिकाण

नांदगाव : अज्ञात इसमाने फेकलेली जळती सिगारेट, विडी अशा तत्सम अग्निजन्य वस्तूमुळे शनिमंदिराजवळील बागेला आग लागून येथील अनेक झाडे व वनस्पती जळून खाक झाल्याची घटना घडली. गेल्या वर्षी अशाच प्रकारे बागेच्या पश्चिम कोपऱ्यात आग लागल्याची घटना घडली होती. शहरातील आबालवृद्धांचे हे एकमेव विरंगुळ्याचे ठिकाण आहे.
बागेच्या उत्तर दिशेकडून आगीचे लोळ उठल्याचे लक्षात आल्यावर अनेक नागरिकांनी तिकडे धाव घेतली. संतोष गुप्ता, दीपक भावसार, रामदास बावणे, समाधान दाभाडे, सुलतान शाह, बाळासाहेब पवार, अरबाझ कलीम मनियार, रामभाऊ बनबेरू अशा अनेकांनी जवळून बादलीने पाणी आणून आग विझविण्याचे प्रयत्न केले. बागकाम कर्मचारी दीपक देशपांडे आज सुटीचा दिवस असल्याने हजर नव्हता. दरम्यान, नगरपालिकेचा पाणीपुरवठ्याचा ट्रॅक्टर आणून पाइपलाइन जोडून त्यावर पाणी मारण्यात आले. तोपर्यंत नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती. नांदगाव नगरपालिकेचा नवा कोरा बंब चालकाची नियुक्ती झालेली नसल्याने दोन वर्षांपासून एकाच जागी उभा आहे.
आपत्कालीन व्यवस्थेसाठी शासनाने तालुकास्तरावर व नगरपरिषद स्तरावर अनेक समित्या व उपाययोजना केलेल्या असताना त्या येथे दिसत नाहीत, अशी चर्चा आग विझविताना नागरिक करताना दिसून आले.
छगन भुजबळांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने ही बाग बनवली आहे. त्यानंतर आज तिची देखभाल नांदगाव नगरपरिषदेकडे आहे. बागेत अनेक व्यायामाची साधने परिषदेने उपलब्ध करून दिली आहेत. ज्येष्ठ नागरिक येथे फिरायला येत असतात. बागेची किमान देखभाल व्यवस्थित व्हावी, नागरिकांनी हा ठेवा जपावा जेणेकरून नांदगावकरांचे विरंगुळ्याचे एकमेव साधन टिकून राहील, अशी अपेक्षा माजी नगरसेवक संतोष गुप्ता यांनी व्यक्त केली.

Web Title: In the garden of Nandagavi, the plants burned, the plants burned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.