माळी समाज वधू-वर परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:09 AM2021-02-19T04:09:25+5:302021-02-19T04:09:25+5:30
हरिओम सांस्कृतिक संस्थेतर्फे वधूवर मेळावा नाशिक: नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाजाच्या हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या वतीने ४ एप्रिल रोजी ...
हरिओम सांस्कृतिक संस्थेतर्फे वधूवर मेळावा
नाशिक: नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाजाच्या हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या वतीने ४ एप्रिल रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी वधूवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहाणे आवश्यक असून इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश बागुल यांनी केले आहे.
कै. रेणुका आजी हिरे यांची पुण्यतिथी
नाशिक: श्रीमती पुष्पाताई हिरे प्राथमिक विद्यालयात कै. रेणुका आजी भाऊसाहेब हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आदरांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ शिक्षक खैरनार यांनी प्रतिमा पूजन केले. सूत्रसंचालन निकम यांनी केले तर भोये यांनी आभार मानले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
खासगी प्राथमिक महासंघाची सभा संपन्न
नाशिक: महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाची सभा कालिका मंदिर ट्रस्ट हॉलमध्ये संपन्न झाली. सभेस जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नंदलाल धांडे यांनी केले. अण्णा पाटील यांचे महासंघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी राजेंद्र निकम, रमेश अहिरे, श्रीकृष्ण सानप, दादाजी अहिरे, अविनाश साळुंके, रूपेश सोनवणे, शिंदे उपस्थित होते.
बागेश्रीतर्फे दीपक दीक्षित यांचा सत्कार
नाशिक: ज्येष्ठ रंगकर्मी, प्रख्यात संवादिनी वादक दीपक दीक्षित यांचा बागेश्री या वाद्यवृंदाच्यावतीने सत्कार करण्यात आला. दिक्षीत यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल कलावंतांच्यावतीने सत्कार करण्यात आल्याचे संचालक चारूदत्त दिक्षीत यांनी सांगितले. टिळकवाडीतील शांतीमय हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदयोन्मुख गायिका साक्षी झेंडे, जास्वंदी जोशी, ऋचा झेंडे, सावनी कुलकर्णी यांनी गीते सादर केली. प्रास्ताविक सोनल अधिकारी यांनी केले. शिल्पा रिसबुड यांनी आभार मानले.
नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीची बैठक
नाशिक : नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत तथा केंद्र शासन समन्वयक संस्था कार्यकारिणीची बैठक ग्राहक पंचायत अध्यक्ष सुहासिनी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नाशिक शहर आणि खेडेगावातील शेतकरी वीज ग्राहकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस विलास देवळे, कृष्णा गडकरी, अनिल नांदोडे, विकास पुरोहित, हेमंत पाठक, रामकृष्ण जंजाळे आदी होते.