गारखेडा प्राथमिक शाळा झाली तंबाखूमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:51 PM2019-12-14T18:51:56+5:302019-12-14T18:52:15+5:30
येवला तालुक्यातील गारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना तंबाखूमुक्तीचा संदेश देत जनजागृती केली.
नगरसूल : येवला तालुक्यातील गारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना तंबाखूमुक्तीचा संदेश देत जनजागृती केली.
नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग सलाम बॉम्बे फाउण्डेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जि. प. शाळा गारखेडा येथे उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी गावात प्रभात फेरी काढून तंबाखूचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.
मुख्याध्यापक संदीप वारु ळे यांनी तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठीच्या ११ निकषांची माहिती दिली. यावेळी शाळेच्या २५० यार्ड परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवन व विक्र ी करण्यास प्रतिबंध करण्यात आला. सरपंच संजय खैरनार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष खैरनार, उपाध्यक्ष समाधान मगर, माला राठोड, संतोष गायकवाड, नानासाहेब आहेर, सदस्य संदीप खैरनार आदी उपस्थित होते. विजय खैरनार यांनी सूत्रसंचालन केले.