लसूण, बटाट्याचे दर कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 02:19 PM2020-02-04T14:19:31+5:302020-02-04T14:20:42+5:30
चांदोरी : एकीकडे भाजीपाल्याच्या दरात घसरण होत असतानाच दुसरीकडे लसूण आणि बटाट्याचे दर तेजीत आहेत. लसूण २०० रूपये किलो तर बटाट्याला ३० रूपये किलोचा भाव मिळत आहे.
चांदोरी : एकीकडे भाजीपाल्याच्या दरात घसरण होत असतानाच दुसरीकडे लसूण आणि बटाट्याचे दर तेजीत आहेत. लसूण २०० रूपये किलो तर बटाट्याला ३० रूपये किलोचा भाव मिळत आहे. रब्बीच्या हंगामात जिल्ह्यातील भाजीपाला क्षेत्रात लागवड वाढली. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला. त्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. जिल्ह्यात यावर्षी टोमॅटो , कोबी, पालक ,मेथी व वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. हा भाजीपाला बाजारात आला आहे. एकाच वेळी मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आवक भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. याचा फाटा भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. टोमॅटो उत्पादकांना सुरवातीच्या काळात चांगला भाव मिळाला मात्र सद्य स्थितीत मात्र उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारात विक्र ी साठी येणाऱ्या टोमॅटाला मजुरीचे पैसे निघणेही अवघड आहे. १० रु पयांत दोन किलो टोमॅटो बाजारात विकले जात आहे. प्रति कॅरेट ५० ते ६० रु पये रु पयांचा दर मिळत आहे. मजुरीचे दर १५० ते २०० रु पये यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. अशीच अवस्था वांग्याची आहे.मागणीच्या तुलनेत वांग्याची आवक वाढली आहे. ५० रु पयाला २० किलो विकली जात आहे.तसेच कोबीला ५ ते ७ रु पये प्रति मग विकले जात आहे.त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आहे.