ढेकू येथील लाभार्थी महिलांना गॅस वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 17:41 IST2019-02-11T17:39:49+5:302019-02-11T17:41:57+5:30
मनमाड : नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ६५ लाभार्थी महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचे वाटप करण्यात आले.

ढेकू येथील लाभार्थी महिलांना गॅस वाटप
छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ पवार, जिल्हा परिषद सदस्य मच्छींद्र पठाडे, पंचायत समिती सदस्य मधुबाला खिराडकर, सरपंच ज्योती सूर्यवंशी, लक्ष्मीनगरचे सरपंच बाबूसाहेब जाधव, धनराज जानराव राष्ट्रवादीचे भाऊसाहेब सूर्यवंशी, प्रहारचे संदीप सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. गॅस वापरताना घ्यावयाची काळजी व वापराचे फायदे याबाबत लाभार्थी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. पिनाकेश्वर गॅस एजन्सीच्या वतीेने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.