गरजूंना अल्प दरात गॅस वाटप
By admin | Published: October 18, 2016 01:01 AM2016-10-18T01:01:54+5:302016-10-18T01:09:32+5:30
उज्ज्वल योजना : राजापूरच्या लाभार्थींना फायदा
ममदापूर : पंतप्रधान उज्ज्वल योजना अंतर्गत अल्प दरात गरजूंना गॅस वाटप करण्यात आले. लाभार्थींनी गॅस वापर केल्याने वृक्षतोडीला आळा बसेल, असे प्रतिपादन संभाजी पवार यांनी केले.
राजापूर येथील शिवकृपा इण्डेन गॅस कंपनीच्या वतीने पंतप्रधान उज्ज्वल योजनेअंतर्गत गॅस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. राजापूर, ममदापूर ही गावे येवला तालुक्यातील अगदी टोकाला असल्याने या भागात गॅस सिलिंडरसाठी यापूर्वी ग्राहकांना येवला येथे यावे लागत होते; परंतु समाधान चव्हाण यांनी या भागात गॅस एजन्सी चालू करून लोकांना सगळ्या प्रकारचे फायदे मिळवून दिले आहेत. त्यामुळे या कामाचे श्रेय त्यांना जाते. प्रातिनिधिक स्वरूपात अंगुलगाव येथील महिलांना संभाजी पवार यांच्या हस्ते गॅस वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच रूपचंद ठाकरे, पोपट आव्हाड, दिनेश आव्हाड, परसराम दराडे, रामदास घुगे, नवनाथ वाघ, अशोक वाघ, अशोक आव्हाड, लहानू आव्हाड, बबन वाघ, सीताराम विंचू, ज्ञानेश्वर बैरागी, शंकर अलगट, सोपान वाघ, मधुकर अलगट, राधाकिसन वाघ, अरुण चव्हाण, दिनेश बैरागी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)