गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८६३ रुपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:17 AM2021-08-22T04:17:37+5:302021-08-22T04:17:37+5:30

जानेवारीत ६९८ रुपयांनी मिळणारा सिलिंडर आज चक्क ८६३ रुपयांना खरेदी करावा लागत आहे. म्हणजे मागील ८ महिन्यांत १६५ ...

Gas cylinders go up by Rs 25 again; Now count Rs 863! | गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८६३ रुपये !

गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८६३ रुपये !

Next

जानेवारीत ६९८ रुपयांनी मिळणारा सिलिंडर आज चक्क ८६३ रुपयांना खरेदी करावा लागत आहे. म्हणजे मागील ८ महिन्यांत १६५ रुपयांनी सिलिंडरचे भाव वाढले आहेत. प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला गॅस सिलिंडर लागतोच. सिलिंडरच्या किमती महागल्या तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होतो. यामुळे गृहिणी वर्गात भाववाढीविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

८ महिन्यांत १६५ रुपयांची वाढ

जानेवारी - ६९८ -

फेब्रुवारी - ७७३ -

मार्च - ८२३ -

एप्रिल - ८१३ -

मे - ८१३ -

जून - ८१३ -

जुलै - ८३८ -

ऑगस्ट -८६३

--

तुटपुंजी सबसिडी बंद; दरवाढ सुरूच

एप्रिल २०२० मध्ये गॅस सिलिंडरचे दर ७५० रुपये होते, तेव्हा १६५.७६ रुपये सबसिडी बँक खात्यात जमा

होत होती. सप्टेंबरपासून ३.२६ रुपये सबसिडी जमा होत आहे; मात्र अनेक ग्राहकांची तक्रार आहे की ही तुटपुंजी

सबसिडीही बँक खात्यात जमा होत नाही.

--

छोट्या सिलिंडरचे दर 'जैसे थे’

पाच किलोच्या छोटा सिलिंडर ५०७.५० रुपयांना मिळत आहे. या सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे छोट्या सिलिंडरचे भाव वाढत नसताना नियमित स्वयंपाकाच्या सिलिंडरचे भाव वाढीविषयी ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

--

व्यावसायिक सिलिंडर पाच रुपयांनी महागला

व्यावसायिक सिलिंडरचे दर पाच रुपयांनी महागले आहेत. सध्या व्यावसायिक सिलिंडर १६८१ रुपयांना मिळत आहे.

--

शहरात चुली कशी पेटवणार

सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे घरगुती बजेट बिघडले आहे. पगार वाढला नाही, पण महागाई

दरमहिन्याला वाढत असल्याने उत्पन्न व खर्चात ताळमेळ बसविणे अवघड झाले आहे, शहरात जळणाचे लाकूडही विकतच घ्यावे लागते त्यामुळे चूल तरी कशी पेटवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

--रोहिणी साळवे, गृहिणी

Web Title: Gas cylinders go up by Rs 25 again; Now count Rs 863!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.