गॅस गळती हाऊन संसार उपयोगी साहीत्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:04 PM2017-09-08T16:04:28+5:302017-09-08T16:05:58+5:30
नाशिक : सिडकोतील हनुमान चौकात गॅस गळती होउन घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहीत्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. गॅसला गळती होत असल्याचे समजताच घर मालक नितीन पवार यांनी प्रसंगावधान दाखवित स्वयंपाक घरातील गॅस सिलींडर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतू आग झपाट्याने वाढल्याने त्यांनी सिलिींडर हे पुढच्या घरातच ठेवून पळ काढला. यात त्यांना दुखापत झाली असुन या घटनेची माहिती कळताच परीसरातील नागरीकांनी अग्निशामक दलास कळविले. या आगीत घरातील संपुर्ण संसार उपयोगी साहीत्य जळून गेले .
सिडकोतील हुनुमान चौकातील रहीवाशी नितीन पद्माकर पवार हे अनेक वर्षापासून पत्नी व मुलगा पार्थ समवेत रहातात. सकाळी पवार ह्यांच्या पत्नी ह्या कामावर व मुलगा पार्थ हा मित्राकडे गेलेला होता. साडेदहा वाजेच्या सुमारास घरमालक नितीन पवार यांनी घरातील नवीन भरलेले गॅस सिलेंडर लावले . परंतू सिलिंडर लावल्या नंतर काही वेळातच त्यातून गॅस गळती होत असल्याचे पवार यांच्या लक्षात आले .पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान दाखवित सिलींडर उचलून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला . परंतू पुढच्या रुममध्ये सिलींडर आणेपर्यंत घरातील देव्हाºयात निरंजन पेटविण्यात आली असल्याने काही वेळातच धुराचे रुपांतर आगीत झाले . आग झपाट्याने वाढत असल्याचे पाहून पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता घरातून पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली.