वालदेवी पुलावर गॅस टॅँकर उलटल्याने गॅस गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 06:31 PM2018-10-26T18:31:56+5:302018-10-26T18:32:36+5:30
नाशिक मुंबई महामार्गावर वाडीव-हे जवळ गॅस टॅँकर उलटून त्यातून गॅस गळती सुरु झाल्याने दोन्ही बाजुची वाहतूक दोन तास ठप्प होती त्यानंतर वाहतूक वाडीव-हे,जातेगाव,आठवा मैल परिसरातून वळविली.
घोटी : नाशिक मुंबई महामार्गावर वाडीव-हे जवळ गॅस टॅँकर उलटून त्यातून गॅस गळती सुरु झाल्याने दोन्ही बाजुची वाहतूक दोन तास ठप्प होती त्यानंतर वाहतूक वाडीव-हे,जातेगाव,आठवा मैल परिसरातून वळविली. घटनास्थळी पोलिस व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.
नाशिक मुंबई महामार्गावरील रायगड नगर जवळील वालदेवी पुलावर सकाळी एक ट्रक उलटला होता,त्यानंतर त्याच्या जवळच एक गॅस टॅँकर उलटल्याने आणि त्यातून गॅस गळती सुरु झाल्याने घबराट निर्माण झाली. पोलिसांनी तत्काळ दोन्ही बाजुची वाहतूकसुमारे चार किलोमीटरवर थांबविल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर वाडीव-हे जातेगाव,आठवा मैल अशी वाहतूक वळविल्याने वाहतूक सुरळीत झाली.
या अपघातात लक्ष्मण रु पसिंग सोलंके (२३) रा नरसिंगपुरा, दिनेश भैरवसिंग सिसोदिया (२४). आणि कैलास सरोदिया (२६) रा. उद्यमनगर असे तीन जण जखमी झाले त्यांना जिल्हा रु ग्णालयात दाखल केले आहे.