चांदवड शहरासाठी गॅस पाइपलाइनचे काम वेगाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:33 AM2021-01-13T04:33:05+5:302021-01-13T04:33:05+5:30
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्यामार्फत होणाऱ्या नाशिक ते धुळे नॅचरल गॅसची पाइपलाइन अंतर्गत महाराष्ट्र नॅच्युरल गॅसचे संचालक ...
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्यामार्फत होणाऱ्या नाशिक ते धुळे नॅचरल गॅसची पाइपलाइन अंतर्गत महाराष्ट्र नॅच्युरल गॅसचे संचालक राजेश पांडे यांना चांदवड शहरांतर्गत गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी काही दिवसांपूर्वी पत्न देण्यात आले होते. सध्या चालू असलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या कामांमध्ये व इतर काही विकास कामे चालू असताना, गॅसची पाइपलाइन करणे अत्यावश्यक असून गरजेची आहे. त्यास अनुसरून बैठक पार पडली. नॅचरल गॅस योजनेचे प्रमुख संचालक राजेश पांडे, मॅनेजिंग डायरेक्टर सुप्रियो हलदार, जनरल मॅनेजर माणिक कदम, बी.डी. इन्चाज अमोल हट्टी, जी.ए. हेड नाशिक-धुळेचे संदीप श्रीवास्तव, जनसंपर्क अधिकारी राजेश आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड येथील विश्रामगृह येथे ही योजना कार्यान्वित करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी पांडे यांनी सांगितले की, आम्ही लवकरच चांदवड शहराला नॅचरल गॅसपुरवठा करण्यासाठी कासलीवाल यांच्या पत्राच्या मागणीवरून प्रयत्नशील आहोत. यासाठी काही दिवसातच आपल्याकडे टेक्निकल टीमअंतर्गत सर्वे करून सदर विषय तत्काळ मार्गी लावण्यात येईल. यामुळे इंधन वापरात स्थानिक नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे ६० टक्के इंधनाची किंवा आर्थिक बचत होऊन याचा लाभ प्रत्येक्षात नागरिकांना होईल, असे सांगितले. यावेळी सुनील डुंगरवाल, प्रशांत ठाकरे, मुख्याधिकारी अभिजीत कदम, मनोज बांगरे, गणोश पारवे, अंकुर कासलीवाल, नितीन फंगाळ आदी उपस्थित होते. यासाठी भूषण कासलीवाल यांनी दि. ३ फेब्रुवारी, २०१९ रोजी पेट्रोलियम तथा नैसर्गिक वायुमंत्री धर्मेंद्र प्रधान, एम.एन.जी.एल. डायरेक्टर राजेश पांडे, मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याकडे पाठपुरावा करून, सदर योजना मंजूर करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. यानंतर पांडे यांनी या प्रकल्पास सकारात्मक होकार दर्शविला व त्याबाबत स्पष्ट खुलासा केल्याने, शहराच्या विकास कामात गॅसप्रकल्प येणार आहे. (वा.प्र.)
-------------------
चांदवड शहरासाठी महाराष्ट्र नॅच्युरल गॅसची पाइपलाइन टाकण्यास कंपनीतर्फे तत्त्वत: मान्यता दिल्याचे पत्र देताना राजेश पांडे, सुप्रियो हलदार, माणिक कदम, अमोल हट्टी, संदीप श्रीवास्तव, राजेश आढावसमवेत भूषण कासलीवाल, प्रशांत ठाकरे, अंकूर कासलीवाल, सुनील डुंगरवाल आदी. (११ एमएमजी १)
===Photopath===
110121\11nsk_12_11012021_13.jpg
===Caption===
११ एमएमजी १