जुन्या कसारा घाटात गॅस टँकर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 01:06 PM2019-03-04T13:06:36+5:302019-03-04T13:06:48+5:30

घोटी : मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या जुन्या कसारा घाटात हिंदुस्थान पेट्रोलियमचा गॅस भरलेला टँकर उलटा झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र टोलप्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेवुन मुंबईला जाणारी व नाशिकला जाणारी वाहतुक नवीन कसारा घाटातून वळवली.

The gas tanker in the old casket pitchers reversed | जुन्या कसारा घाटात गॅस टँकर उलटला

जुन्या कसारा घाटात गॅस टँकर उलटला

Next

घोटी : मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या जुन्या कसारा घाटात हिंदुस्थान पेट्रोलियमचा गॅस भरलेला टँकर उलटा झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र टोलप्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेवुन मुंबईला जाणारी व नाशिकला जाणारी वाहतुक नवीन कसारा घाटातून वळवली. मुंबई आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटात सकाळी सवा नऊ वाजेच्या सुमारास मुंबईहुन मनमाडकडे जाणारा हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा गॅस भरलेल्या टँकरला अज्ञात वाहनाने कट मारल्याने टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्यात पलटी झाला. या घटनेची माहिती मिळताच पेट्रोलियम कंपनीचे सेफ्टी मॅनेजर अखील पंचोरी, टोलप्लाझाचे पेट्रोलींग कर्मचारी फीरोज पवार, जावेद खान, समाधान चौधरी, दिपक उघाडे, नवनाथ गुंजाळ, विक्र म खाजेकर, सुरेश जाधव, राहुल पुरोहित, सुरज आव्हाड, विजय कुंडगर, महामार्ग रस्ता सुरक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय लोखंडे, पोलीस हवालदार योगेश पाटील, संतोष माळोदे, बी. सी. चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस टँकर मधुन गॅस लीकीज असल्याचे लक्षात येताच सुरक्षेच्या दृष्टीने ताबडतोड या महामार्गवरील वाहतुक नवीन कसारा घाटातुन एकेरी मार्गे वळवण्यात आली आहे. दरम्यान, गॅस लिकेज बंद करण्यासाठी एक्सपर्ट टीमला कळवल्याची माहिती महामार्ग रस्ता सुरक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय लोखंडे यांनी दिली.

Web Title: The gas tanker in the old casket pitchers reversed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक