टाकी फुटण्याच्या अफवेचा ‘पेट्रोल बॉम्ब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:18 AM2018-03-13T01:18:25+5:302018-03-13T01:18:25+5:30
दूरच्या प्रवासात तुम्ही एखाद्या पेट्रोलपंपावर थांबून पंपचालकाला टाकी फूल करण्यास सांगितले आणि तुमच्या सोबत असलेल्या मित्राने टाक ी फूल करू नका स्फोट होईल, असे कधी सांगितले आहे का? आतापर्यंत असे कोणी सांगितले नसेल तर यापुढे नक्कीच कोणीतरी नेटिझन्स तुम्हाला ही गोष्ट सांगितल्याशिवाया राहणार नाही.
नाशिक : दूरच्या प्रवासात तुम्ही एखाद्या पेट्रोलपंपावर थांबून पंपचालकाला टाकी फूल करण्यास सांगितले आणि तुमच्या सोबत असलेल्या मित्राने टाक ी फूल करू नका स्फोट होईल, असे कधी सांगितले आहे का? आतापर्यंत असे कोणी सांगितले नसेल तर यापुढे नक्कीच कोणीतरी नेटिझन्स तुम्हाला ही गोष्ट सांगितल्याशिवाया राहणार नाही. कारण उन्हाळ्यात पेट्रोलची टाकी पूर्ण भरल्यास गॅस तयार होऊन तिचा स्फोट होऊ शकतो अशी भीती पसरविणारी पोस्ट सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. त्यामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले असले तरी संबंधित कं पनीने ही पोस्ट चुकीची व अनधिकृत असल्याचा खुलासा यापूर्वीच केलेला आहे. सोशल मीडियावर इंडियन आॅइल कंपनीच्या नावाने मेसेज फिरत असून, यातून वाहनात कमाल मर्यादेपर्यंत इंधन भरू नये, असे आवाहन केले जात आहे. वाहनात पूर्ण क्षमतेने पेट्रोल भरल्यास इंधनाच्या टाकीचा स्फोट होऊ शकतो, त्यामुळे केवळ अर्धीच टाकी पेट्रोल भरण्याचा व दिवसातून एकदा टाकीचे झाकन उघडून बंद करण्याचा सल्ला देतानाच असे करण्याने टाकीत तयार होणार गॅस बाहेर निघून जाईल, असेही सुचविण्यात आले असून हा संदेश नातेवाइकांसह सर्व परिचितांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वाºयाच्या वेगाने ही अफवा पसरत असून, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. परंतु, या अफवेत कोणतेही तथ्य नसून व्हायरल झालेली पोस्ट पूर्णपणे चुकीची आहे. तिच्याशी कंपनीचा संबंध नसल्याचे इंडियन आॅइलने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.