मनमाड रेल्वेस्थानकात गॅसगळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:10 PM2017-10-02T23:10:19+5:302017-10-02T23:10:26+5:30
मनमाड रेल्वेस्थानकात घडलेल्या घटनेनंतर पाहणी करताना अधिकारी. मनमाड : मुंबई येथील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आलेला असताना, आज मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक सहावर असलेल्या छोट्या स्टॉलवरील सिलिंडरमधून गॅसगळती होऊन किरकोळ आग लागल्याने प्रवाशांची धावपळ उडाली.
मनमाड रेल्वेस्थानकात घडलेल्या घटनेनंतर पाहणी करताना अधिकारी.
मनमाड : मुंबई येथील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आलेला असताना, आज मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक सहावर असलेल्या छोट्या स्टॉलवरील सिलिंडरमधून गॅसगळती होऊन किरकोळ आग लागल्याने प्रवाशांची धावपळ उडाली.
येथील सहा नंबरच्या फलाटावर डोसा विक्री करणारा लहान स्टॉल असून, तपोवन एक्स्प्रेस फलाटावर आल्यानंतर प्रवाशांना गरम डोसा मिळावा यासाठी वेंडरने गॅस सुरू केला. मात्र अचानक सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आग लागली. आग लागल्याचे पाहून डोसा घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांनी पळ काढला, तर इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रेल्वे कर्मचाºयांनी तातडीने फायर बाटल्यांचा वापर करून काही क्षणातच आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच स्टेशन मास्तर पी. के. सक्सेना, सहायक स्टेशन मास्तर गरुड, मुख्य वाणिज्य निरीक्षक अनिल बागले, मुख्य तिकीट निरीक्षक एस.पी. कांबळे, आरपीएफ सबइन्स्पेक्टर रजनीश यादव, रेल्वे पोलीस निरीक्षक एन. के. मदने यांच्यासह इतर अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तातडीने आग आटोक्यात आणल्यामुळे सुदैवाने जीवित अथवा मालमत्तेची हानी झाली नाही. या प्रकरणी रेल्वे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
मनमाड रेल्वेस्थानकाचे सुरक्षा आॅडिट करण्यात यावे अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करूनही दखल घेण्यात आलेली नाही. आजची घटना गंभीर असून, त्यास जबाबदार असणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी. - नितीन पांडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष