पेट्रोल मिळेल पण, चालकांचा परवाना रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:17 AM2021-08-14T04:17:56+5:302021-08-14T04:17:56+5:30
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंप चालकांच्या प्रबोधनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले ...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंप चालकांच्या प्रबोधनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले की, प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’चे जनजागृतीपर फलक लावण्यात यावे. यासोबतच पोलीस ठाण्यातर्फे प्रत्येक पेट्रोल पंपावर २४ तास पोलीस बंदोबस्त दिला जाईल. तसेच कोणी विना हेल्मेट या ठिकाणी पेट्रोल घेण्यास आले तर त्यांना पेट्रोल द्यावे. मात्र, त्यांची सर्व माहिती भरून वाहतूक शाखेकडे जमा करावी. त्या व्यक्तिचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याची तरतूद पोलीस आयुक्तांनी दिलेल्या परिपत्रकामध्ये नमूद केली आहे. यासोबतच प्रत्येक पेट्रोलपंप धारकाने सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासनाला देणे बंधनकारक राहील. याखेरीज कोणाला काही अडचण आल्यास किंवा कोणी पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी विना हेल्मेट दडपशाहीचा वापर करू लागल्यास तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले. तसेच नागरिकांनीदेखील हेल्मेटचा वापर करून आपला जीव धोक्यात घालण्यापासून वाचवावा. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे, संजय बेडवाल, उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, कैलास सोनवणे, पोलीस नाईक कैलास निंबकर, अशोक आव्हाड, पंकज शेळके, प्रशांत नागरे आदींसह अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारा पेट्रोल पंप मालक व व्यवस्थापक उपस्थित होते.
(फोटो १३ पोलीस) - अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंप चालकांच्या बैठकीत मार्गदर्शक करताना पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, समवेत किशोर कोल्हे, संजय बेडवाल, उत्तम सोनवणे आदी.