कळवण तालुक्यातील देवळीकराड येथे गॅस्ट्रोची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:38 AM2017-11-19T00:38:55+5:302017-11-19T00:40:32+5:30
कळवण/अभोणा : कळवण तालुक्यातील देवळीकराड येथे गॅस्ट्रोची लागण झाली असून, ७५ पेक्षा अधिक आदिवासी बांधवांना बाधा झाली आहे. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधाही तत्काळ उपलब्ध न झाल्याने शनिवारी (दि. १८) आदिवासी बांधवांना दिवसभर धावपळ करावी लागली. गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांना तिºहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व अभोणा ग्रामीण रु ग्णालयात गॅस्ट्रो लागन झालेल्या रु ग्णांना दाखल करण्यात आले तर उर्विरत रु ग्णांना देवळीकराड येथील ग्रामपंचायत कार्यालय व सभामंडपामध्ये 100 ते 125 आदीवासी रु ग्णांवर उपचार करण्यात आले .
कळवण/अभोणा : कळवण तालुक्यातील देवळीकराड येथे गॅस्ट्रोची लागण झाली असून, ७५ पेक्षा अधिक आदिवासी बांधवांना बाधा झाली आहे. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधाही तत्काळ उपलब्ध न झाल्याने शनिवारी (दि. १८) आदिवासी बांधवांना दिवसभर धावपळ करावी लागली. गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांना तिºहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व अभोणा ग्रामीण रु ग्णालयात गॅस्ट्रो लागन झालेल्या रु ग्णांना दाखल करण्यात आले तर उर्विरत रु ग्णांना देवळीकराड येथील ग्रामपंचायत कार्यालय व सभामंडपामध्ये 100 ते 125 आदीवासी रु ग्णांवर उपचार करण्यात आले . विषबाधीतात भारती गावित ( 40 ) , वंदना मुरलीधर जोपळे ( 35 ) शांताराम भिला गावित ( 45 ) विनबाई लक्ष्मण देशमुख ( 29 ) हिराजी येवाजी दळवी ( 50 ) अशोक हिराजी दळवी ( 23 ) चेतना नागदेव गावित ( 14 ) विमल राजू देशमुख ( 35 ) मधुकर दामु गावित ( 40 ) इंदुबाई सोमा गावित ( 45 ) अनिता युवराज गावित (35 ) बायजाबाई सोमनाथ बागुल ( 65) रमेश भिल गावित ( 35 ) वसंत एकनाथ गावित ( 26 ) नामदेव भगवान गावित ( 45 ) चंद्रकांत रामदास भोये ( 25 ) अलका सावळीराम गायकवाड ( 30 ) शशिकांत वामन गावित ( 30 ) सावळीराम हिराजी गायकवाड ( 37 ) कमळीबाई भिला गावित ( 65 ) मिना सोमा गावित ( 26 ) लिला हिराजी गावित ( 40 ) सर्व राहणार देवळी कराड आदींचा समावेश आहे.
गॅस्ट्रो लागन झालेल्या रु ग्णांना सकाळी अभोणा ग्रामीण रु ग्णालयात रु ग्ण दाखल करु न न घेतल्यामुळे अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अभोणा ग्रामीण रु ग्णालयात रु ग्ण घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याची तक्र ार आदीवासी बांधवांनी केली.
देवळीकराड येथे गॅस्ट्रो लागन झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी
अध्यक्षा सौ जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तात्काळ देवळीकराड येथे भेट देऊन आदीवासी बांधवांची विचारपूस केली . अभोणा येथील ग्रामीण रु ग्णालयात जाऊन गॅस्ट्रो लागन झालेल्या रु ग्णांची भेट घेतली व जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या यंत्रणेशी संपर्क साधून घटनेची माहीती दिल्याने तत्काळ नाशिक येथून देवळीकराड येथे तातडीने औषध पुरवठा पाठविण्यात आला.
देवळीकराड गावाला होणारा पाणीपुरवठा दुषित आहे हे लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले. देवळीकराड येथील आदीवासी बांधवांनी गॅस्ट्रोची लागन झाली असून या रु ग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आहे.
आरोग्य विभागाने देवळीकराड गावातील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवावा व पाणी उकळून पिण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी ग्रामस्थांना केले.
चौकटीत घ्या -
दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी प्याले जाते. त्यामुळे आजारांना सामोरं जावं लागतं. पण जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात.दूषित पाण्यापासून पाच ते सहा प्रकारचे आजार होतात. त्यात गॅस्ट्रो हा पिहला आजार होतो . गॅस्ट्रोच्या आजारात रु ग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणं दिसू लागतात.
उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. रु ग्णाला दूषित पाणी झाल्याने गॅस्ट्रो होतो.
- आरोग्य विभाग कळवण