हिसवळ येथे गॅस्ट्रोची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2015 11:35 PM2015-12-11T23:35:35+5:302015-12-11T23:41:16+5:30
हिसवळ येथे गॅस्ट्रोची साथ
नांदगाव : हिसवळ (खु.) येथे दूषित पाण्याने नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रावर तीन दिवसात ४३ रुग्णांवर उपचार केल्याची माहिती डॉ. संतोष जगताप यांनी दिली.
बुधवारी (दि. ९) पाच, गुरुवारी १३ व शुक्रवारी (दि. ११) २५ अशा ४३ रु ग्णांवर उपचार करण्यात आले असून, सरपंच विजय अहेरही येथे उपचार घेत आहेत. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. साथ आटोक्यात असल्याचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी सांगितले. डॉ. संतोष जगताप, डॉ. विजया जगताप यांनी रु ग्णांवर उपचार केले. दरम्यान, आमदार पंकज भुजबळ यांनी या प्रकरणी लक्ष दिल्याने वेळेत औषधे उपलब्ध झाली असून, साथ आटोक्यात येत आहे. गटविकास अधिकारी चित्रलेखा कोठावळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचा संपर्क झाला नाही. (वार्ताहर)