बदल्याच्या निर्णयाच्या विरोधात द्वारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:39 AM2018-06-14T00:39:01+5:302018-06-14T00:39:01+5:30

वीज कर्मचाऱ्यांच्या बदल्या विनंतीनुसार न करण्याच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांच्या वतीने वीज भवन येथे व्दारसभा झाली.

 Gateway against transfers decision | बदल्याच्या निर्णयाच्या विरोधात द्वारसभा

बदल्याच्या निर्णयाच्या विरोधात द्वारसभा

googlenewsNext

नाशिकरोड : वीज कर्मचाऱ्यांच्या बदल्या विनंतीनुसार न करण्याच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांच्या वतीने वीज भवन येथे व्दारसभा झाली.  महावितरणने वीज कर्मचाºयांच्या बदल्या विनंतीनुसार न करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी वीज भवन येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने द्वारसभा घेण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, वीज कंपनी दरवर्षी मे महिन्यात वितरण कंपनीमधील कर्मचारी यांची विनंतीवर मागणी केलेल्या ठिकाणी बदली केली जात होती. मात्र गेल्या सोमवारी तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांच्या बदल्या करु नये असे परिपत्रक कंपनीकडून काढण्यात आले. त्यामुळे विनंती बदलीला पात्र असलेल्या कर्मचाºयांवर कंपनी अन्याय करीत आहे. द्वारसभेत व्ही.डी. धनवटे, अरूण म्हसके, जी.एच.वाघ, पंडित कुमावत, दिपक गांगुर्डे, मधुकर जाधव, प्रकाश जाधव, सतीश पाटील, एच.आय. खान, प्राची पाटील, गुलाब आहेर, पोपट पेखळे, विनायक क्षिरसागर, सुनील मालुंजकर, भाऊसाहेब पाळदे, रघुनाथ ताजनपुरे, भास्कर सातव आदि उपस्थित होते.
तांत्रिक, अतांत्रिक कर्मचारी यांनी सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी अशी विनंती कंपनीकडे केली होती. जागा रिक्त असतांनाही या नवीन परिपत्रकामुळे विनंती ठिकाणी बदली करण्याचे बंद केले आहे. कंपनीमधील वरिष्ठ अधिकारी यांच्या बदल्या मागील महिन्यात त्यांच्या सोयीच्या ठिकाणी करण्यात आल्या. मात्र तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना बदली पासून वंचीत ठेवण्यात आल्याने कर्मचा-यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विनंती बदली न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title:  Gateway against transfers decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक