गुन्हेगारांचा आश्रयदाता 'श्याम पवार'च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:46 PM2017-07-29T13:46:54+5:302017-07-29T14:00:11+5:30
पंचवटी : खून, हाणामार्या, चोरी तसेच विविध प्रकारच्या गंभीर गुन्ातील संशयित गुन्हेगारांना वेळोवेळी आर्थिक मदत, आदिवासी भागात राहण्यासाठी आसरा उपलब्ध करून देणारा सुरगाणा तालुक्यातील श्याम नागू पवार यास पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पंचवटी : खून, हाणामार्या, चोरी तसेच विविध प्रकारच्या गंभीर गुन्ातील संशयित गुन्हेगारांना वेळोवेळी आर्थिक मदत, आदिवासी भागात राहण्यासाठी आसरा उपलब्ध करून देणारा सुरगाणा तालुक्यातील श्याम नागू पवार यास पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारांचा आश्रयदाता पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर खून, जबरी लूट यांसारखे गुन्हे दाखल आहेत. पंचवटीत काही दिवसांपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या किरण निकम याच्या खुनातील काही संशयितांना पवार याने आश्रय दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. याबरोबरच पवार हा नाशिक शहरातील पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड, अंबड या भागातील गुन्हेगारांना आर्थिक मदत तसेच सुरगाणा भागातील आदिवासी पाड्यावर राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देत होता़ किरण निकम खून प्रकरणातील संशयितांना पवार याने मदत करून आश्रय दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्याला गजाआड करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि़ २७) सापळा रचला होता. सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक महेश कुलकर्णी, मोतीराम चव्हाण, आप्पा गवळी, सतीश वसावे, भूषण रायते, सचिन म्हस्दे, निंबाळकर, बस्ते, जितू जाधव यांनी सुरगाणा येथे जाऊन पवारला बेड्या ठोकून पंचवटी पोलीस ठाण्यात आणले़ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या श्याम पवार याच्यावर व्यापार्याचे अपहरण करून खून करणे, दरोडा यांसह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे. पोलिसांवरही संशयिताचा वचक? सुरगाणा परिसरात राहणारा श्याम नागू पवार हा राजकीय पक्षाचे काम करून पोलिसांवर वचक निर्माण करायचा. खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पवारची छापच निराळी होती. स्थानिक पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तेथील पोलीस अधिकारी व कर्मचारी या गुन्हेगाराला बसण्यासाठी खुर्ची देऊन बडदास्त ठेवत असत़ विशेष म्हणजे पवार याचा सुरगाणा परिसरात अवैध व्यवसाय असूनही त्याकडे सुरगाणा पोलीस दुर्लक्ष करायचे, तसेच गुन्हेगारांना शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर पवार दबाव तर टाकायचाच याशिवाय गुन्हेगारांना पळवून लावायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली़.