गौरी बक्षीने राष्ट्रीय क्रमवारीत पटकावले १९ वे स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:09+5:302021-09-16T04:20:09+5:30
नाशिक : जेईई मेन २०२१ सत्र चारचा निकाल मंगळवारी (दि. १४) रात्री उशिरा घोषित करण्यात आला असून, यात ...
नाशिक : जेईई मेन २०२१ सत्र चारचा निकाल मंगळवारी (दि. १४) रात्री उशिरा घोषित करण्यात आला असून, यात विक्रमी अशा ४४ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाईल गुणवत्तेने यश संपादन केले असून, यात नाशिकच्या गौरी बक्षी हिने राष्ट्रीय क्रमवारीत १९ वे स्थान पटकावले आहे तर शाहझेब अर्शद ९९.९७, तन्मय राणे ९९.८३, हरिष गयाधनी ९९.८१, समीर देशपांडे ९९.७७, गौतम अहुजा ९९.६९, गौरंग दहाड ९९.६२ पर्सेंटाईल गुणांसह यश संपादन केले आहे.
जेईई मेन २०२१ परीक्षेत पहिल्या क्रमवारीत १८ जणांना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे यावर्षी ७ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परीक्षा दिली होती. यातील ज्या १८ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमवारीत स्थान मिळवले आहे, त्यात महाराष्ट्रातील अथर्व अभिजित तांबट या एकमेव मराठी विद्यार्थ्याचा समावेश असून, आंध्राचे सर्वाधिक ४ तर त्यापाठोपाठ राजस्थानचे ३, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी २ विद्यार्थी प्रथम क्रमवारीतील १८ विद्यार्थ्यांमध्ये आहेत. नाशिकमधील विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत लक्षवेधी यश संपादन केले असून, रोहित शाह, सोहम पाटील, प्राजक्ता दराडे, ऋषिकेश कच्छवा, महावीर खिंवसरा, प्रसन्न दवंगे, संकेत बाफना, संदेश अहिरे, अमित सोनजे, जीनम संचेती, आदित्य मोहिते, समर्थ ससाणे, आर्यन पोपळघट या विद्यार्थ्यांनी ९० पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुणांसह यश संपादन केले आहे.
150921\15nsk_51_15092021_13.jpg~150921\15nsk_53_15092021_13.jpg~150921\15nsk_58_15092021_13.jpg
जेईई मेनमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांचे लक्षवेधी यश~ जेईई मेनमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांचे लक्षवेधी यश~ जेईई मेनमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांचे लक्षवेधी यश