गौतम बुद्ध हे जगातील सर्वात मोठे तत्त्वज्ञ : वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:26 PM2020-01-12T23:26:26+5:302020-01-13T00:58:42+5:30

अनेक गोष्टींमुळे जगात अराजकता माजली आहे. याला कारण आपले विचार हेच आहे. गौतम बुद्धांनी यावर सखोल अभ्यास करत त्या काळात समाजातील बुरसटलेले विचार दूर सारून त्यांच्यामध्ये एक नवचेतना निर्माण केली होती. गौतम बुद्ध हे जगातील सर्वात मोठे तत्त्वज्ञ आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी व माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.

Gautam Buddha is the greatest philosopher in the world: the tiger | गौतम बुद्ध हे जगातील सर्वात मोठे तत्त्वज्ञ : वाघ

गौतम बुद्ध हे जगातील सर्वात मोठे तत्त्वज्ञ : वाघ

Next

नाशिक : अनेक गोष्टींमुळे जगात अराजकता माजली आहे. याला कारण आपले विचार हेच आहे. गौतम बुद्धांनी यावर सखोल अभ्यास करत त्या काळात समाजातील बुरसटलेले विचार दूर सारून त्यांच्यामध्ये एक नवचेतना निर्माण केली होती. गौतम बुद्ध हे जगातील सर्वात मोठे तत्त्वज्ञ आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी व माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.
संवाद या संस्थेतर्फे रविवारी (दि.१२) कुसुमाग्रज स्मारकात ‘बुद्ध-ताओ आणि विज्ञान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाघ प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. गौतम बुद्धांनी त्यावेळी जीवनाचे सत्य शोधून ते सर्वांपर्यंत नेण्याचे काम केले असे वाघ यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाषचंद्र येवले होते. प्रास्ताविक संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. किरण पिंगळे यांनी केले.

Web Title: Gautam Buddha is the greatest philosopher in the world: the tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.