गावठाणांची ड्रोनद्वारे होणार मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:39 AM2019-07-30T01:39:48+5:302019-07-30T01:40:35+5:30

गावांचा विकास साधण्याबरोबरच गावठाणाची हद्द निश्चित करण्यासाठी आता ड्रोनच्या साह्याने जिल्ह्यातील गावांची मोजणी होणार आहे.

 Gauthans will be calculated by drone | गावठाणांची ड्रोनद्वारे होणार मोजणी

गावठाणांची ड्रोनद्वारे होणार मोजणी

Next

नाशिक : गावांचा विकास साधण्याबरोबरच गावठाणाची हद्द निश्चित करण्यासाठी आता ड्रोनच्या साह्याने जिल्ह्यातील गावांची मोजणी होणार आहे. या मोजणीच्या माध्यमातून गावठाणाचे डिजिटल नकाशे तयार होणार असल्याने गावठाण विकासाला यामुळे चालना मिळणार आहे. विधानसभा निवणुकीनंतर या कामाला गती येणार असून, तत्पूर्वी गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
विस्तारलेल्या गावठाणाचा विकास करण्यासाठी शाश्वत मोजणी अपेक्षित आहे.  मात्र गावठाणातील अतिक्रमण आणि अन्य कारणांमुळे गावठाणाची हद्द निश्चित करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज ड्रोनद्वारे मोजणी केली जाणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून मोजणी ही पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी वेळेत आणि अचूक होण्यास मदत होणार आहे. याशिवाय कमी मनुष्यबळात अद्ययावत, अशी माहिती आणि डिजिटल नकाशेदेखील यामुळे उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांना लवकरच जमिनीची सनद मिळणे सुलभ होणार आहे. या संदर्भात जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनीदेखील नुकतीच या कामकाजाची माहिती घेतल्याचे समजते.
१९३० नंतर गावठाणच्या मोजणीचे काम झालेले नाही. म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी गावठाणाची मोजणी करण्यात आली होती. आता गावठाणाच्या विस्तारलेल्या कक्षा लक्षात घेता गावातील रस्ते, शासनाच्या जागा, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, गावातील चतु:सीमा निश्चित होऊन या मिळकतींचे अभिलेख तयार होणार असून, गावातील नागरिकांना जमिनीची सनद म्हणजेच मालकी हक्काचा पुरावा अचूक तयार होणार आहे. याबरोबरच ड्रोन छायाचित्रांसह डिजिटल नकाशा तयार होणार आहे. ज्या गावठाणांमध्ये अद्यापही सर्वेक्षण झालेले नाही असा ठिकाणी ड्रोनद्वारे भूमापन केले जाणार असून, जिल्ह्णात प्रथमच अशाप्रकारचे भूमापन होणार आहे.
ड्रोन मोजणीमध्ये ग्रामपंचायती कार्यक्षेत्रातील मिळकतींच्या मालमत्ता कराची आकारणी, अन्य करांची आकारणी, महसुलाचे नियोजन करणे सुलाभ होणार आहेच शिवाय मिळकतींच्या सीमादेखील निश्चित होणार आहेत. विकास आराखडा तयार करताना या मोजणीचादेखील उपयोग होणार आहे.
निवडणुकीनंतर होणार मोजणी
जिल्ह्णात सदर मोहीम राबविण्यास काहीसा विलंब होणार आहे. सध्या निवडणुकीची धामधूम असल्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतरच या कामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी गावागावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून होणाºया मोजणीबाबतची जनजागृती करावी लागणार आहे.
ड्रोन मोजणीचे लाभ
१) ड्रोनच्या साह्णाने करण्यात येणाºया मोजणीमुळे अचुक सीमा आणि डिजिटल छायाचित्रे तयार होणार आहेत.
२) गावातील अतिक्रमण आणि शासकीय जमिनीची अचुक माहिती मिळणे होणार सुलभ.
३) ग्रामपंचायतींना कराचे धोरण आखण्यासाठी उपयुक्त माहिती.
४) जमीनधारकांना लागलीच जमिनीची सनद मिळणार. यामुळे कर्ज प्रकरणात होणार लाभ.
६) बांधकामासाठी डिजिटल नकाशा ठरू शकतो अधिकृत पुरावा.
७) हद्द निश्चितीमुळे विकासाची ठरणार दिशा.
८) हद्दीच्या वादावर प्रभावी उपाय.
पुणे येथील पथदर्शी प्रकल्प
पुणे जिल्ह्यातील सोनोरी गावाची मोजणी प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली होती. येथील नागरिकांना काही दिवसांतच जमिनीची सनद देण्यात आली होती. गावातील मिळकतींचे नकाशेदेखील तयार करण्यात आले होेते. गावातील प्रत्येक भूखंडधारकाला त्याच्या भूखंडाचा नकाशा आणि मालकी हक्काचा पुरावा म्हणून मिळकत पत्रिका उपलब्ध झाले होते.

Web Title:  Gauthans will be calculated by drone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.