गवंडगावी शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:50 PM2019-05-21T18:50:16+5:302019-05-21T18:50:43+5:30
येवला : तालुक्यातील गवंडगाव येथे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्व शेतकऱ्यांना शेतीविषयी विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कृषी सहायक मोरे यांनी मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीवरील नियंत्रण याविषयी माहिती दिली. कृषी सहाय्यक गोसावी यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीवरील नियंत्रण, निंबोळी अर्क तयार करणे, बियाणे घेताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. यावेळी अंदरसूल कृषी मंडळ अधिकारी पाटोळे, कृषी पर्यवेक्षक काळोखे यांनीदेखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच वेणुनाथ भागवत, चांगदेव भागवत, निवृत्ती भागवत, अंबादास भागवत, प्रमोद भागवत, एकनाथ भागवत, ज्ञानेश्वर भागवत, देवा भागवत, सोमनाथ भागवत, फकीरा भागवत, नाना भागवत, ज्ञानेश्वर जोंधळे, अर्जुन भागवत, संजय भागवत, भारत भागवत भागिनाथ भागवत भाऊसाहेब भागवत, रामदास भागवत, नारायण भागवत राजेंद्र भागवत, राहुल भागवत, बाळू बोरसे, फकीरा भागवत, नामदेव भागवत, एकनाथ भागवत, बाळू भागवत, सतीश भागवत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.