गवार १००, कारली ८० रु पये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:31 AM2019-03-24T00:31:05+5:302019-03-24T00:31:29+5:30
उन्हाळ्याला सुरु वात झाली नाही तोच बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोनवेळेचा हिरवा भाजीपाला खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागत आहे.
पंचवटी : उन्हाळ्याला सुरु वात झाली नाही तोच बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्वच फळभाज्यांचेबाजारभाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोनवेळेचा हिरवा भाजीपाला खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागत आहे. पंचवटी परिसरात दैनंदिन भरणाऱ्या व आठवडे बाजारात विक्र ीसाठी येणाºया फळभाज्या खरेदीसाठी ग्राहकांना १०० रु पयांची नोटदेखील कमी पडत आहे.
काही दिवसांपासून उन्हाळ्याला सुरु वात झाली आहे. उन्हाच्या झळा अजून वाढायचे असल्या तरी त्याआधीच फळभाज्यांचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत. आठवडे बाजारात मेथी ३०, तर कांदापात २५, करडई १०, शेपू २० रु पये प्रति जुडी दराने विक्र ी होत आहे. फळभाज्यांमध्ये गवार १०० रु पये, तर कारली, दोडका ८० रु पये, टमाटा ४०, ढोबळी मिरची ६० रु पये किलो दराने विक्र ी होत आहे. फ्लावर कोबी १५ रु पये कंद प्रति दराने विक्र ी होत असल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दैनंदिन भाजीपाल्यात आणणाºया हिरव्या मिरचीचे बाजार भावदेखील ८० रु पये किलो असल्याने ग्राहकांना मिरचीची चव तिखटच असे म्हणावे लागत आहे.
भाजीबाजारात मेथी, शेपू, पालक, कांदा पात या हिरव्या भाज्यांसह टमाटा, काकडी, कोबी, फ्लॉवर, दोडका, गिलके, गवार, हिरवी, मिरची, कारली, ढोबळी मिरची यांसह अन्य फळभाज्या विक्र ीसाठी दाखल होत आहेत.
उन्हाळ्यात शेतमालाला पाणी कमी पडत असल्याने बाजारभाव तेजीत येत असतात मात्र यंदाच्या वर्षी उन्हाळाच्या प्रारंभीपासूनच फळभाज्यांचे बाजारभाव गगनाला भिडल्याने सध्यातरी सर्वसामान्य ग्राहकांना रोजच्या जेवणात लागणारा भाजीपाला खरेदीसाठी खिशाचा विचार करावा लागत आहे.