गांजा तस्करीतील फरार संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:39 AM2019-01-12T00:39:41+5:302019-01-12T00:40:39+5:30
गत सहा महिन्यांपूर्वी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शिवसेनेची महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे हिच्या गुदामावर छापा मारून कोट्यवधी रुपये किमतीचा हजारो किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणातील फरार संशयित अशोक मगन मोहिते (३५,बेलदारवाडी, म्हसरूळ) यास गुन्हे शोध पथकाने मालेगाव येथून अटक केली आहे. गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत लक्ष्मी ताठेसह दहा संशयितांना अटक केली आहे.
पंचवटी : गत सहा महिन्यांपूर्वी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शिवसेनेची महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे हिच्या गुदामावर छापा मारून कोट्यवधी रुपये किमतीचा हजारो किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणातील फरार संशयित अशोक मगन मोहिते (३५,बेलदारवाडी, म्हसरूळ) यास गुन्हे शोध पथकाने मालेगाव येथून अटक केली आहे. गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत लक्ष्मी ताठेसह दहा संशयितांना अटक केली आहे.
जुलै २०१८ मध्ये तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर एका चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर आदींसह पथकाने सापळा रचून या वाहनातून लाखो रुपये किमतीचा सुमारे ६८० किलो गांजा जप्त केला होता. या गांजाची तस्करी करणाऱ्या संशयितांचा पोलीस शोध घेत असताना शिवसेना महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे हे नाव पुढे आले होते़
दरम्यान या प्रकरणातील दहावा संशयित अशोक मोहिते हा मालेगावला असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बलराम पालकर, संजय मुळक, दिलीप मुंडे, येवाजी महाले, गणेश वडजे, बंटी चव्हाण आदींनी मालेगाव येथून मोहितेला अटक केली.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे १ कोटी रुपयांचा एक हजार आठशे किलो गांजा जप्त केला आहे.
तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांना ‘कोटपा’
नाशिक : शाळा, कॉलेजच्या शंभर यार्ड परिसरात सिगारेट, गुटखा, खैनी यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असल्याने सदर मोहीम यापुढे व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे. यासाठी संस्थाचालक, संस्था याबरोबरच पालकांनादेखील सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करण्यास बंदी असतानाही चोरट्यापद्धतीने अशाप्रकारची विक्री होताना दिसते.
या विक्रीच्या विरोधात वारंवार सूचना आणि कारवाई करूनही शाळा, कॉलेजच्या परिसरात अशाप्रकारचे अड्डे निर्माण झाले आहेत. या ठिकाणी गुन्हेगारी स्वरूपाच्यादेखील घटना घडत असल्याने आता यापुढे अशा ठिकाणांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
चोरीछुप्या पद्धतीने बेकायदेशीर अमली पदार्थ विकणाºयांवर ‘कोटपा’ कायद्याचा चाप बसविण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी कोटपा कायद्याचे खास प्रशिक्षण नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक सुरेश जाधव, अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात देण्यात आले. कर्करोगतज्ज्ञ डॉ. शैलेश बोंदार्डे यांनी यावेळी तंबाखूमुळे होणाºया कॅन्सरबाबत सविस्तर माहिती दिली, तर संबंध हेल्थ फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक देवीदास शिंदे यांनी सिगारेट्स आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक (कोटपा) कायद्याची कलमे, कारवाई आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत खास प्रशिक्षण नाशिक ग्रामीण पोलिसांना दिले.
कोटपा कायद्याच्या सततच्या कारवाया केरळ आणि कर्नाटक राज्यात तंबाखूचा वापर कमी करण्यास प्रभावी ठरल्या आहेत. महाराष्ट्रातदेखील पोलिसांबरोबर काम करण्यास आम्हाला आनंद होत असल्याचे केअरिंग फ्रेंड्सचे निमेश सुमती यांनी सांगितले.