विस्थापितांच्या पुनर्वसनावरून सभा गाजलीयेवला पालिका : विविध समस्यांवर सदस्य आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:33 AM2017-07-21T00:33:54+5:302017-07-21T00:35:22+5:30

येवला पालिका : विविध समस्यांवर सदस्य आक्रमक

Gazaleyewala Municipal Council on the rehabilitation of displaced persons: Members aggressively on various issues | विस्थापितांच्या पुनर्वसनावरून सभा गाजलीयेवला पालिका : विविध समस्यांवर सदस्य आक्रमक

विस्थापितांच्या पुनर्वसनावरून सभा गाजलीयेवला पालिका : विविध समस्यांवर सदस्य आक्रमक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : विस्थापितांचे पुनर्वसन करण्यास प्राधान्य द्या, रस्त्यांची कामे करा, पथदीप पूर्ववत सुरू करा, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केल्याने ेपालिकेची सभा चांगलीच गाजली.
नगरसेविका शीतल शिंदे, सरोजिनी वखारे यांनी आक्रमक भूमिका मांडली. ४४ विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली. गुरु वारी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सूरज पटणी, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर होते. कॉलनी भागातून सर्वाधिक महसूल मिळतो. या भागातून नागरिकांचा मोर्चा आला तरीही सांगितलेले कोणतेही काम होत नाही. घरात पावसाचेपाणी येते. यातून मार्ग काढावा. पावसाळापूर्व तयारी पालिकेने केली नाही. रस्त्यावर खड्डे झाले, असा आरोप शीतल शिंदे यांनी केला. खुल्या जागांचा विकास करण्याची मागणी सरोजिनी नगरसेविका वखारे यांनी केली. या प्रश्नावर नगरसेवक रुपेश लोणारी, प्रवीण बनकर,अजय जैन, सचिन मोरे, झामभाऊ पहिलवान यांनी उपप्रश्न विचारले. खड्डे भरले जातील, असे आश्वासन मुख्याधिकारी मेनकर यांनी दिले. शहरात व नव्या वसाहतीत स्वच्छता होत नाही.सगळीकडे घाणीचे साम्राज्य आहे.रस्त्यावर सर्वत्र कचरा पडला आहे. नालासफाई झाली नाही याचे फोटोच नगरसेवक सचिन मोरे यांनी दाखवले. यावर केवळ १०० सफाई कर्मचारी आहेत, घंटागाडीची संख्या कमी आहे, स्वच्छता करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उत्तर स्वच्छताप्रमुखांनी दिले. अस्वच्छतेबाबत नगरसेवक शफिक शेख, रु पेश लोणारी यांनी नापसंती दिर्शवली. नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेले पथदीप पालिकेने टोल कंपनीकडून ताब्यात घ्यावेत, असे नगरसेवक रु पेश दराडे यांनी सुचवले. पथदीपासाठी पोल उभारले पण दिव्याचा पत्ताच नाही अशी स्थिती शहरात दिसत आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला.
बांधकाम विभागाकडून कोणती कामे चालू आहेत याची माहिती सचिन शिंदे, रुपेश लोणारी यांनी केली. बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेली दवाखान्याची जागा पुन्हा पालिकेकडे घ्यावी या प्रस्तावावर बोलताना रा.कॉ. गटनेते डॉ. संकेत शिंदे यांनी जागेवर शिवसृष्टीचे निर्माण प्रस्तावित असून, निधी मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचे सुचवले.विस्थापितांचे पुनर्वसन करा गाळ्यांच्या लिलावाबाबतच्या विषयावर डॉ. संकेत शिंदे यांनी विस्थापित झालेल्या गाळेधारकांचे पुनर्वसन अगोदर करावे, अशी मागणी करीत प्रस्तावच सादर केला. गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे पुनर्वसन शक्य आहे. हवे तर राष्ट्रवादी या प्रश्नावर साथ द्यायला तयार आहे. पुनर्वसन नाही तर लिलाव नाही, अशी भूमिका डॉ. शिंदे यांनी घेतली. भटक्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त या प्रश्नावर बोलताना नगरसेवक रु पेश लोणारी आणि प्रवीण बनकर यांनी भटकी कुत्री पकडून बाहेर सोडण्याची मागणी केली. यावर मुख्याधिकारी यांनी कुत्री पकडण्यासाठी निविदा काढूनही कोणीही पुढे येत नसल्याचे सांगितले.

Web Title: Gazaleyewala Municipal Council on the rehabilitation of displaced persons: Members aggressively on various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.