स्वच्छता, उद्यानाच्या  विषयांवरून गाजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:33 AM2018-12-29T00:33:22+5:302018-12-29T00:34:06+5:30

पूर्व प्रभाग सभेत स्वच्छता आणि उद्यान या दोन विषयांवर प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले होते तसेच उद्यानाची देखभाल होत नसेल तर संबंधित ठेकेदारास बिल न देण्याचे सदस्यांनी मागणी केली.

 Gazoli meeting on cleanliness, gardening issues | स्वच्छता, उद्यानाच्या  विषयांवरून गाजली सभा

स्वच्छता, उद्यानाच्या  विषयांवरून गाजली सभा

Next

इंदिरानगर : पूर्व प्रभाग सभेत स्वच्छता आणि उद्यान या दोन विषयांवर प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले होते तसेच उद्यानाची देखभाल होत नसेल तर संबंधित ठेकेदारास बिल न देण्याचे सदस्यांनी मागणी केली.  पूर्व प्रभागसभा सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली बोलण्यात आली होती. यावेळी प्रभाग ३० मध्ये लहान-मोठ्या रस्त्याचे स्वच्छतेविषयी आम्ही नियोजन करून दिले होते. त्यामुळे स्वच्छता चांगली होत होती. परंतु नियोजन प्रमाणे स्वच्छता होत नसल्याने पुन्हा रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तसेच स्वच्छता कर्मचारी काम करत नसल्याची तक्र ार सतीश सोनवणे यांनी केली. पूर्व प्रभागातील आणि प्रभाग ३० मधील उद्यानांची अवस्था दैना झाली असून, संबंधित ठेकेदार काम करत नसल्याने त्याची बिले न काढण्याची मागणी अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी केली. सायंकाळ होताच वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर बसथांबा ते कैलासनगर बसथांबा या रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्याने चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार बडोदे यांनी केली. प्रभागातील सर्वच उद्यानाची दुरवस्था झाली असून. त्याची देखभाल संबंधित ठेकेदार करीत नाही. त्यामुळे आम्हाला स्वखर्चाने उद्यानाची देखभाल करावी लागते, असे डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी तक्रार केली तसेच प्रभागात डेंगूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, मलेरिया विभाग काम करत नसल्याची तक्र ार कुलकर्णी यांनी केली काठेगल्ली सिग्नल ते नागजी सिग्नल या रस्त्यादरम्यान दुतर्फा विक्री त्यांचे हात गाडी उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार गेल्या सभेस करूनही अद्यापि परिस्थिती जैसे थेच असल्याचे अर्चना थोरात यांनी सांगितले तसेच स्वच्छता कर्मचारी स्वच्छता केल्यानंतर कचरा रस्त्याच्या कडेला ठेवता ते उचलण्यासाठी ढकलगाड्या केव्हा मिळणार? असा प्रश्न सुषमा पगारे यांनी केला. अशोका मार्गावर स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करीत नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तसेच युनिक कॉलनी फिरणारा घंटागाडीचालक कचरा घेताना नागरिकांकडून पैसे मागतो, अशी तक्र ार शाहीन मिर्झा यांनी केली.
त्या विक्रेत्यांवर होणार कारवाई
काठेगल्ली सिन्नर ते नागजी सिग्नल रस्त्याच्या दुतर्फा अनेक विक्रेते व्यवसाय करतात. हा रहदारीचा मार्ग असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार सदस्यांनी केली. त्यामुळे विक्रे त्यांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांनी दिले.

Web Title:  Gazoli meeting on cleanliness, gardening issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.