‘जेमिनिड’ उल्का वर्षावाची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:42 AM2019-12-14T00:42:00+5:302019-12-14T00:42:17+5:30
खगोल शास्त्रांच्या अभ्यासकांसह खगोलप्रेमींना शनिवारी मध्यरात्री मिथून राशीतून होणारा ‘जेमिनिड’ उल्का वर्षाव पाहण्याची विलोभनीय संधी मिळणार असून, खगोलप्रेमींना ही उल्का वर्षावाची मेजवानी शनिवारी मध्यरात्रीनंतर आणि रविवारी पहाटेच्या सुमारास पहायला मिळणार असून, खगोल अभ्यासकांना वर्षातील सर्वांत प्रलंबित मिथुन राशीतील जेमिनिड उल्का वर्षाव अभ्यासण्याची उत्सुकता लागली आहे.
नाशिक : खगोल शास्त्रांच्या अभ्यासकांसह खगोलप्रेमींना शनिवारी मध्यरात्री मिथून राशीतून होणारा ‘जेमिनिड’ उल्का वर्षाव पाहण्याची विलोभनीय संधी मिळणार असून, खगोलप्रेमींना ही उल्का वर्षावाची मेजवानी शनिवारी मध्यरात्रीनंतर आणि रविवारी पहाटेच्या सुमारास पहायला मिळणार असून, खगोल अभ्यासकांना वर्षातील सर्वांत प्रलंबित मिथुन राशीतील जेमिनिड उल्का वर्षाव अभ्यासण्याची उत्सुकता लागली आहे.
खगोलशास्त्राच्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.१५) पहाटे २ ते ४ वाजेदरम्यान उल्कापात शिखरांवर राहणार असून, उल्कांचे प्रमाण ताशी १२० ते १५० इतके राहणार असल्याचे ‘नासा’ आणी ‘इंटरनॅशनल मेटिओर आॅर्गनायझेशन’कडून सुचविण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा पृथ्वी एखाद्या धूमकेतूच्या मार्गातून जाते त्यावेळी त्या धूमकेतूच्या शेपटीतील धूलीकण वेगाने पृथ्वीच्या वातावरणात शीरताट आणि घर्षनामुळे त्यांचे उल्कापातमध्ये रूपांतर होते. परंतु, मिथुन (जेमिनिड) राशीतील उल्का वर्षावाचा स्रोत हा ३२०० फेथन नावाचा लघुग्रह आहे.